Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर 'ती' चूक ! स्वतःच मागितली चाहत्यांची माफी, नेमकं काय घडलं ?

Amitabh Bachchan :  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींपासून ते दैनंदिन अनुभवांपर्यंत अनेक गोष्टी ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. विशेष म्हणजे, ते X (पूर्वीचे ट्विटर) वरील प्रत्येक पोस्टला एक विशिष्ट क्रमांक देतात. मात्र, अलीकडेच पोस्टच्या क्रमांकात त्यांच्याकडून एक छोटीशी चूक झाली. ही बाब लक्षात येताच त्यांनी स्वतः पोस्ट करत चाहत्यांची माफी मागितली.



अमिताभ बच्चन यांची प्रकृती आणि कामाचा व्यस्त दिनक्रम


अमिताभ बच्चन वयाच्या या टप्प्यावरही आपल्या कामात व्यग्र आहेत. अलीकडेच त्यांनी प्रकृती ठीक नसल्यामुळे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही काळ विश्रांती घेणार असल्याचे चाहत्यांना सांगितले होते. तरीही ते आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.सध्या ते लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या चित्रीकरणात आणि सूत्रसंचालनात व्यस्त आहेत. याशिवाय, त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अमिताभ बच्चन आपल्या प्रत्येक पोस्टला ‘T’ या अक्षरासह क्रमांक देतात. मात्र, अलीकडेच पोस्ट क्रमांक लिहिताना त्यांच्याकडून गफलत झाली. ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ती दुरुस्त करत सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले.


त्यांनी पोस्टमध्ये लिहिले,


“ट्वीटच्या क्रमांकात चूक झाली आहे. जिथे 48 पासून सुरुवात झाली होती, तिथे 58 असायला हवे होते. याबद्दल मी माफी मागतो.” त्यांच्या या पोस्टमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले. स्वतःकडून झालेली छोटीशी चूकही त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केली. आपल्या कामातील बारकाव्यांकडे लक्ष देण्याची आणि चूक झाल्यास ती स्वीकारण्याची त्यांची वृत्ती यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली.





अमिताभ बच्चन यांच्या आधीच्या पोस्टचा क्रमांक T 4896 असा होता. त्याआधीच्या पोस्टला T 5895 हा क्रमांक देण्यात आला होता. त्यामुळे क्रमांकांच्या मालिकेत 48 ऐवजी 58 असायला हवे होते, हे त्यांच्या नंतर लक्षात आले.ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून खुलासा केला आणि चाहत्यांची माफी मागितली. त्यांच्या या साध्या आणि प्रामाणिक प्रतिक्रियेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.



‘कल्की 2898 एडी’च्या सीक्वेलमध्येही दिसणार अमिताभ बच्चन ? 


अमिताभ बच्चन यांच्याकडे आगामी काळात अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित कल्की 2898 एडी या चित्रपटातील अश्वत्थामाच्या भूमिकेत त्यांनी प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली होती.या चित्रपटाच्या आगामी भागाबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अश्वत्थामाच्या व्यक्तिरेखेचा पुढील प्रवास कसा असेल आणि त्याच्या सामर्थ्याचे कोणते नवे पैलू समोर येतील, हे पाहणे रंजक ठरणार आहे.


दरम्यान, पोस्टच्या क्रमांकातील छोटीशी चूक स्वतः मान्य करून माफी मागणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या या कृतीतून त्यांचा कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा दिसून येतो. वयाच्या या टप्प्यावरही त्यांचा उत्साह आणि कामातील सातत्य चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Comments
Add Comment

Vishnubala : सयाजी शिंदेंचा मुलगा सिद्धार्थ करणार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, ‘विष्णूबाळा’ चित्रपटातून बापलेकाची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आता नव्या कलाकारांची एन्ट्री पाहायला मिळत आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांची पुढची पिढी

अनिरुद्ध आणि काव्या मारनचा नोव्हेंबरमध्ये पार पडणार विवाहसोहळा; पत्रिकेने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालक काव्या मारन यांच्या विवाह सोहळ्याच्या आमंत्रण

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांच्या प्रकृतीबाबत करीनाचा खुलासा, प्रसिद्ध टिव्ही शोमध्ये बेबोनं सर्व सांगितलं

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने तिच्या वडीलांच्या तब्येतीविषयी माहिती दिलेली आहे. अलीकडेच

Music Concert Safety Tips : म्युझिक कॉन्सर्टला जाताय ? तुमचा अनुभव सुरक्षित आणि खास बनवण्यासाठी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी!

संगीत मैफिलीचा (Music Concert) आनंद घेणे हा एक उत्तम अनुभव असतो; मात्र गर्दी आणि घाईगडबडीत लहान-सहान चुकांमुळे तुमचा मूड

विजय-रश्मिकाच्या नात्याबाबत खोट्या पोस्टचा सुळसुळाट? मॅनेजरची पोलिसांत तक्रार

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या एका शोमधील व्हिडिओज वायरल होत आहेत.

King Movie : ओठांवर गुलाब, डोळ्यांत आग! शाहरुख खानचा ‘किंग’मधील खतरनाक अवतार चर्चेत; रिलीजची तारीखही ठरली

King Movie: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आता या