स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावरील 'रिसर्च प्रोजेक्ट'ला मंजुरी

डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर करणार संशोधन


बीड : बीड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांना भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत 'इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च' (ICSSR) कडून ६ लाखांचा रिसर्च प्रोजेक्ट मंजूर झाला आहे.


या प्रकल्पामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य आणि सामाजिक कार्य यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. डिसेंबर २०२५ मध्ये मेजर व मायनर रिसर्च प्रोजेक्टसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. बाहेगव्हाणकर यांनी "स्वातंत्र्यवीर सावरकर : ए लिटररी ल्युमिनरी अँड टायटन ऑफ द सोशल रिफॉर्म्स" या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला आणि तो मंजूर झाला. प्रकल्पाचा कालावधी एक वर्ष असून, यासाठी ६ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे.


डॉ. बाहेगव्हाणकर हे सावरकर साहित्याचे नामवंत अभ्यासक आहेत. त्यांनी मागील २५ वर्षांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनकार्य, साहित्य, सामाजिक व राजकीय कार्य, भाषाशुद्धी, लिपी सुधारणा व वैज्ञानिक दृष्टिकोन यावर हजारो व्याख्याने महाराष्ट्र आणि राज्याबाहेर दिली आहेत. तसेच 'हर घर सावरकर' उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला असून, निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे सुसज्ज ग्रंथालय त्यांनी स्थापन केले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी