Dhurandhar 2 : बॉक्स ऑफिसवर धुरंधर २ चा धूमाकूळ , लवकरच १००० कोटींचा टप्पा गाठणार

मुंबई - अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. लवकरच धुरंधर २ सिनेमा आणखीन नवा विक्रम करणार आहे.


धुरंधर १ सिनेमानं कमी दिवसांत हजार कोटींचा टप्पा केला. पण धुरंधर २ सिनेमा त्यापेक्षा कमी कालावधीत म्हणजेच जेमतेम आठवड्याभरातच हजार कोटींचा टप्पा पार करणार असं दिसत आहे. प्रदर्शित झाल्यापासून धुरंधर २ हा चित्रपट उत्तम कमाई करत आहे. या चित्रपटानं जगभरात छप्परफाड कमाई केली आहे. अवघ्या सहा दिवसांत या सिनेमानं ९०० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता सातव्या दिवशी हा चित्रपट हजार कोटींचा टप्पा पार करणार हे दिसत आहे.


धुरंधर २ चे कलेक्शन


पेड प्रीव्यू - ४३ कोटींची कमाई - बुधवार १८ मार्च २०२६ (कामकाजाचा दिवस)
पहिला दिवस - १०२.५५ कोटी - गुरुवार १९ मार्च २०२६ (गुढी पाडव्याची सुट्टी)
दुसरा दिवस - ८०.७२ कोटी - शुक्रवार २० मार्च २०२६ (कामकाजाचा दिवस)
तिसरा दिवस - ११३ कोटी - शनिवार २१ मार्च २०२६ (ईदची सुट्टी)
चौथा दिवस - ११४.८५ कोटी - रविवार २२ मार्च २०२६ (सुट्टी)
पाचवा दिवस - ६५ कोटी - सोमवार २३ मार्च २०२६ (कामकाजाचा दिवस)
सहावा दिवस - ५६.५५ कोटी - मंगळवार २४ मार्च २०२६ (कामकाजाचा दिवस)


काय आहे धुरंधर २ ?


'धुरंधर २' (Dhurandhar 2: The Revenge) हा आदित्य धर दिग्दर्शित एक बहुचर्चित हिंदी अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे, जो १९ मार्च २०२६ रोजी गुढी पाडव्याला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांसारखी मोठी स्टारकास्ट पाहायला मिळते. या सिनेमाचा कालावधी तब्बल ३ तास ५२ मिनिटे इतका असून तो आधुनिक सिनेमातील सर्वात मोठा सिनेमा आहे.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी