Iran-US-Israel War : इराणने केली पाकिस्तानची कोंडी; पाकिस्तानी जहाजाला होर्मुझ पार करण्यापासून रोखले

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा आज २७वा दिवस असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने पाकिस्तानच्या कराचीकडे जाणाऱ्या एका जहाजाला होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्यापासून रोखले आहे.


आयआरजीसी चे नौदल कमांडर अलीरेझा तंगसिरी म्हणाले की, 'सेलेन' नावाच्या या जहाजाला होर्मुझ पार करण्याची परवानगी नव्हती. ते म्हणाले की, या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला आधी इराणी अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेल. हे सर्व प्रकरण तेव्हा घडले जेव्हा पाकिस्तान या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पझशिकयान यांच्याशी फोनवर बोलणे केले होते.


दरम्यान, युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत भारताचे ५ एलपीजी आणि तेल टँकर होर्मुझमधून बाहेर पडले आहेत. यात जग वसंत, पाइन गॅस, शिवालिक, नंदा देवी आणि जग लाडकी यांचा समावेश आहे.


इराणमधील हल्ल्यांत आतापर्यंत सुमारे १,५०० लोकांचा मृत्यू, तर १८,५५१ जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये ८ महिन्यांच्या बाळापासून ते ८८ वर्षांपर्यंतच्या वृद्धांचा समावेश आहे. युद्धात आतापर्यंत सुमारे २०० महिलांचा मृत्यू झाला. २८ फेब्रुवारी रोजी शाळेवरील हल्ल्यात १६८ मुलांचा मृत्यू झाला. युद्धात ५५ आरोग्य कर्मचारी जखमी झाले, त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.