नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास सिग्नलमुक्त करण्यासाठी रबाळे, पावणे आणि तुर्भे येथे उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. त्याशिवाय पाम बीच रोडच्या जंक्शनजवळ, विशेषतः नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयापाशी, एक दुहेरी भुयारी मार्ग अंडरपास तयार करण्यात येणार आहे.


सोमवारी झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि ऐरोली-वाशी येथील खाडी पुलांमुळे ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. यामुळे सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत सत्ताधारी पक्षाने व्यक्त केले.


हा प्रकल्प 'हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल' अंतर्गत राबवला जाणार आहे. यानुसार, प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ३० टक्के रक्कम सुरुवातीला दिली जाईल. तर उर्वरित ७० टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षांत हप्त्यांद्वारे भरली जाईल. यामुळे महानगरपालिकेवर अचानक कोणताही मोठा आर्थिक बोजा पडणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.


सभागृहात हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला असला, तरी विरोधकांनी यावर आक्षेप घेतले आहेत. प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च, कंत्राटदाराची माहिती आणि तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती यांबाबत स्पष्टता नसल्याचा दावा शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. खर्चात पारदर्शकता असावी आणि निधीचा अपव्यय होऊ नये, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन