Nitesh Rane : सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (AI) प्रकल्प राबविण्यात येणार - मंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरवातीला काजू व आंब्यासाठी प्रत्येकी 200 अशा एकूण 400 शेतकऱ्यांची निवड करून प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यात आंबा आणि काजू उत्पादकांचा समावेश आहे, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसंदर्भात A.I. चा वापर करण्याबाबत एडीटी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे निलेश नलावडे यांनी सादरीकरण केले. यावेळी दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संचालक (कृषी व नवोपक्रम) डॉ. भूषण गोसावी, एडीटी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय तज्ज्ञ (मृदा विज्ञान) डॉ. विवेक भोईटे, सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग डॉ. वैभव शिंदे , धोरणात्मक सल्लागार डॉ. संतोष देशमुख, शास्त्रज्ञ डॉ. संजनी साळुंखे उपस्थित होते.



मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, प्रकल्पसाठी शेतकऱ्यांचा मूलभूत डेटा, नाव, संपर्क क्रमांक, गाव आदी माहिती संकलित करून त्यांच्या शेतीचे डिजिटायझेशन करावे. पहिल्या दोनशे शेतकऱ्यांमध्ये प्रकल्प यशस्वीपणे राबविल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यात येईल. हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर इतर शेतकरीही स्वयंस्फूर्तीने या तंत्रज्ञानाचा स्वीकार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


एडीटी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय तज्ञांनी सांगितले की, प्रकल्प राबवितांना आवश्यक ठिकाणी सेन्सर्स बसवून माती, झाडे आणि उत्पादन स्थितीचे परीक्षण करण्यात येईल.या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना केवळ प्रशिक्षण नव्हे तरकृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाबाबत जागरूकता दिली जाईल. विभागनिहाय गट तयार करून प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जाणार आहेत. सुमारे 150 दिवसांचा पहिला टप्पा ठेवण्यात आला असून 20-25 शेतकऱ्यांच्या गटांमध्ये काम केले जाईल.


पारंपरिक पद्धतीत 4-5 दिवस लागणारी फवारणी ड्रोनच्या साहाय्याने काही तासांत पूर्ण होऊ शकते, त्यामुळे रोग नियंत्रण जलद आणि प्रभावी होईल, असे त्यांनी नमूद केले. यासोबतच यांत्रिकीकरण वाढवण्यावरही भर देण्यात येणार आहे. AI आधारित प्रिडिक्टिव्ह मॉडेलद्वारे पिकांवरील रोगांचा अंदाज आधीच घेता येईल, ज्यामुळे अनावश्यक कीटकनाशक वापर आणि ब्लॅक मार्केटिंगवर नियंत्रण येईल, असेही एडीटी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय तज्ञांनी सांगितले.

Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे