Cup Bashi Movie : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार सासू-सुनेची 'ही' कमाल जोडी, 'कप बशी' सिनेमाचं पोस्टर रिलीज

सासू आणि सुनेचं नातं म्हटलं की प्रेम, आदर राग तर कधी रुसुवे फुगवे अशा संमिश्र भावना येतात. लवकरच या नात्यातील एक सुंदर गोष्ट मराठी सिनेविश्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित 'कप-बशी' हा आगामी सिनेमा येत्या ५ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नुकताच या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यातं आलं आहे.


या सिनेमात अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत तर अभिनेता ऋषी मनोहर नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, विनय येडेकर, चिन्मय शिंत्रे, पूर्णिमा तळवलकर, आनंद काळे अशी जबरदस्त स्टारकास्ट असल्यानं या सिनेमातून उत्तम अभिनयाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.


या सिनेमात अरूण आणि अरूणा हे दांपत्य त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधत असतात. परंतु ​अरूणा यांच्या अध्यात्मिक गुरूनं सूनेबाबत काही अटी सांगितल्या आहेत. त्या अटींनुसार अरूणा मुलगी शोधत असतात. त्यांना तशीच मुलगी सापडते का? तर सूनेबाबत नक्की अशी कोणती अट आहे? त्यांचं पुढे लग्न जुळणार की नाही? अशा धमाल आशयसूत्रावर 'कप बशी' हा सिनेमा आधारित आहे. आताच्या आधुनिक काळातही पत्रिका पाहण्यासारख्या परंपरांवर भाष्य करत मनोरंजक पद्धतीनं कथानक मांडण्यात आलं असून येत्या ५ जून २०२६ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहता येणार आहे.





सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेनं 'कप बशी' सिनेमाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या सिनेमाचे निर्माते आहेत. तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश राठी यांनी या सिनेमाची प्रस्तुती केली आहे. या सिनेमाची पटकथा ​​​, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिलेलं आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’