सार्वजनिक शौचालयांमध्ये महिलांसाठी आकारले जाणारे शुल्क माफ?

मुंबई: मुंबईतील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या महिलांकडून सार्वजनिक शौचालय वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांमध्ये आकारले जाणारे शुल्क हे तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून शुक्रवारी होणाऱ्या गटनेत्यांच्या सभेमध्ये यावर निर्णय घेतला जाणार आहे.


शिवसेना पदाधिकारी डॉ नविन शेवाळे यांनी याबाबत उपमहापौर संजय घाडी यांना निवेदन देवून ही मागणी केली असून हे पत्र उपमहापौरांच्या माध्यमातून गटनेत्यांच्या सभेपुढे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंजुरी घेण्यासाठी ठेवण्यात आले आहे. शेवाळे या मागणीनुसार उपमहापौर संजय घाडी यांनी गटनेत्यांच्या बैठकीपुढे मांडलेल्या पत्रामध्ये असे नमुद केले आहे की,झोपडपट्टी विभागातील अनेक गरीब व कष्टकरी महिलांना सार्वजनिक शौचालय वापरण्यासाठी दररोज शुल्क भरावे लागते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांसाठी हा अतिरिक्त खर्च मोठा बोजा ठरत असून, त्यामुळे अनेक महिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


या शुल्कामुळे महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेवरही परिणाम होत आहे. स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांसाठी शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याचे सांगत, सर्व महिलांसाठी सार्वजनिक शौचालये मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी हा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे . त्यामुळे गटनेते यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर