IPL 2026 : पहिल्या सामन्याआधीच RCB ला धक्का! 'हा' स्टार खेळाडू बाहेर

मुंबई : आयपीएल २०२६ च्या थराराला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात आरसीबी (Royal Challengers Bengaluru) आणि हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने येणार आहेत. हा सामना बंगळूरमधील चिन्नास्वामी मैदानावर रंगणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आरसीबीला मोठा धक्का बसला आहे.


आरसीबी संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूड (Josh Hazlewood) हा पहिला सामना खेळणार नसल्याची माहिती मुख्य प्रशिक्षकांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, “हेझलवूड अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही. आम्ही त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहोत आणि त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहोत.”


हेझलवूडच्या अनुपस्थितीमुळे आरसीबीची गोलंदाजी कमकुवत होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात त्याने १२ डावांत २२ विकेट्स घेत संघाच्या यशात मोठा वाटा उचलला होता. त्याची ४/३३ ही सर्वोत्तम कामगिरी ठरली होती, तर इकॉनॉमी रेट ८.७७ होता.


दरम्यान, मुख्य प्रशिक्षक यांनी विराटच्या फॉर्मचेही कौतुक केले. ते म्हणाले, “जसे मी पूर्वी सचिन तेंडुलकरचा सराव पाहायचो, तसेच आता विराटचा सराव पाहणे आनंददायी आहे. तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून खूप फिट आणि निर्धाराने खेळताना दिसतो.”



जाणून घ्या आरसीबीचे यंदाच्या हंगामातील वेळापत्रक :



  • २८ मार्च : RCB vs SRH – बंगळूर

  • ५ एप्रिल : RCB vs CSK – बंगळूर

  • १० एप्रिल : RCB vs RR – गुवाहाटी

  • १२ एप्रिल : RCB vs MI – मुंबई

  • १५ एप्रिल : RCB vs LSG – बंगळूर

  • १८ एप्रिल : RCB vs DC – बंगळूर

  • २४ एप्रिल : RCB vs GT – बंगळूर

  • २७ एप्रिल : RCB vs DC – दिल्ली

  • ३० एप्रिल : RCB vs GT – अहमदाबाद

  • ७ मे : RCB vs LSG – लखनौ

  • १० मे : RCB vs MI – रायपूर

  • १३ मे : RCB vs KKR – रायपूर

  • १७ मे : RCB vs PBKS – धर्मशाला

  • २२ मे : RCB vs SRH – हैदराबाद


पहिल्याच सामन्यापूर्वी आलेल्या या धक्क्यामुळे आरसीबीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता संघ या परिस्थितीत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून