Nepal News : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांच्या कारवाईत माजी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना अटक

नेपाळमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पोलिसांनी अटक केली आहे. भक्तपूरमधील गुंडू येथील त्यांच्या निवासस्थानातून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ‘झेन-जी’ आंदोलनादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.


या प्रकरणात नेपाळचे माजी गृहमंत्री रमेश लेखक यांनाही अटक करण्यात आली आहे. नव्याने सत्तेवर आलेल्या पंतप्रधान बालेन शाह (Balen Shah) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही मोठी कारवाई करत कठोर संदेश दिला आहे.


शुक्रवारी (२७ मार्च) ३५ वर्षीय बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. रॅपर ते महापौर आणि आता देशाचे पंतप्रधान असा त्यांचा प्रवास असून ते नेपाळच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. शपथविधीनंतर लगेचच झालेल्या या अटकेमुळे देशात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.


सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळमध्ये ‘झेन-जी’ आंदोलन उसळले होते. या आंदोलनादरम्यान हिंसाचार भडकला आणि अवघ्या दोन दिवसांत ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्या वेळी सत्तेवर असलेल्या ओली सरकारवर या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत होती. आता याच प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.


दोषी ठरल्यास ओली यांना १० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. नेपाळच्या राजकारणातील प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या ओली यांनी यापूर्वी गृहमंत्री, उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.


२०२६ मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून पुढील काळात नेपाळच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका