'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, सोशल मिडियावर भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे सेक्रेड गेम्स,मँटो आणि ब्लॅक वॉरंट यांसारख्या सिनेमामध्ये झळकली आहे. आपल्या दमदार अभियनानं  राजश्रीनं प्रेक्षकांची मने जिंकली. नुकताच या अभिनेत्रीनं सोशल मिडियावर एक पोस्ट करत तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्याबद्दल खुलासा केला असून तिने स्तनाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रियेचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.


या पोस्टमध्ये राजश्रीने सांगितले की जेव्हा तिला पहिल्यांदा कर्करोगाचं निदान झाल्याचे समजले, तेव्हा ती रुग्णालयात एकटीच होती. त्या क्षणी ती मानसिकदृष्ट्या कोलमडून गेली होती. राजश्रीनं लिहिलयं की, तिला जेव्हा या आजाराचे निदान झाले तेव्हा ती पूर्णपणे खचून गेली होती. ती एकटी बसून रडण्याचा तो क्षण तिला आजही आठवतो. त्यावेळी तिच्या मनात अनेक प्रश्न होते, पण त्यापैकी एकाही प्रश्नाचं स्पष्ट उत्तर तिच्याकडे नव्हतं.


या पोस्टमध्ये पुढे राजश्री म्हणाली असे काही दिवस असतात जेव्हा माझ्यात ताकद नसावी असं वाटतं. मला फक्त शांत राहायचं असतं. मेरी ऑलिव्हरचा कवितेतल्या त्या चिमण्यासारखं, ज्या माझ्या खिडकीतल्या बोगनव्हिलियावर बसून माझ्यासोबत सूर्योद्याकडे बघत बसतात. पण आज मी ते करून दाखवलं. मी स्वत:साठी एक स्माईल आणि एक मिठी मिळवली आणि त्या सर्व लोकांचा विचार केला जे प्रवासात माझ्यासोबत आहेत, ज्यांनी फोन केला, मेसेज केले आणि मला खूप प्रेम दिलं. मला माहित आहे की उद्या मी लढण्यासाठी आणखी तयारी करत असेन, पण आजचा दिवस प्रेमाचा असू दे. असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.





अभिनेत्री राजश्री देशपांडेला ग्रेड १ स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. वेळेत उपचार घेतल्यामुळे तिने शस्त्रक्रिया करून घेतली. आता ती हळूहळू बरी होत असून तिने शेअर केलेल्या या तिच्या या अनुभवामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळणार आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’