IPL 2026 : पहिला सामना हरण्याची मुंबई इंडियन्स परंपरा राखणार?

मुंबई : आयपीएल २०२६ (IPL 2026) मधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध कोलकता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता रंगणार आहे. आयपीएलमध्ये तब्बल पाच वेळा विजेतेपद मिळवणारा संघ अशी मुंबईची ख्याती आहे. पण २०२० पासून मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळविता आलेले नाही. आतापर्यंत झालेल्या १८ हंगामांपैकी सलग १३ आणि एकूण १४ वेळा मुंबई इंडियन्सच्या त्यांच्या साखळी फेरीतील सलामीच्या सामन्यात पराभव झाला आहे. यंदाच्या सलामीच्या सामन्यात हरल्याल मुंबई इंडियन्स सलग चौदाव्यांदा आणि एकूण १५ वेळा त्यांचा साखळी फेरीतील सलामीचा सामना गमावल्याचा नवा विक्रम नोंदवणार आहेत. हा नको असलेला विक्रम टाळण्यात मुंबईची टीम यशस्वी होणार का याकडे अनेकांचे लक्ष आहे.


साखळी सामन्यांमध्ये असलेल्या गटामध्ये अन्य संघांच्या तुलनेत मुंबई इंडियन्सचे पारडे कागदावर तरी प्रभावी दिसत आहे. वानखेडे स्टेडियम या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स पहिला विजय मिळवते का पाहुया. या सामन्यात मुंबईचे पारडे जड वाटते. विश्वचषक २०२६ मधील ४ हुकमी एक्के मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळताना दिसतील. कर्णधार हार्दिक पांड्या, विश्वचषक २०२६ भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार याादव, तिलक वर्मा, विश्वचषक २०२६ गाजवलेला गोलंदाज जसप्रीत बुमराह. त्याशिवाय रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, नमन धीर, रायन रिकल्टन, शेरफेन रुदरफोर्ड , कॉर्बीन बॉश असे चांगले फलंदाज मुंबई इंडियन्सकडे आहेत. मुंबईची पलटन फलंदाजीत काय कमाल करते, याची उत्सुकता राहील. गोलंदाजीत बुमराह, टेंट बोल्ट, दिपक चहर, शार्दुल ठाकुर, मयांक मारकंडे, कॉर्बीन बॉश असे गोलंदाज आहेत. कोलकता नाइट रायडर्स संघात कर्णधार अजिंक्य रहाणे, कॅमरुन ग्रीन, फिन एलेन, टिम सेफर्ट, यष्टीरक्षक, मथीशा पथिराना रिंकू सिंग, सुनील नारायण असे नामांकीत खेळाडू आहेत फलंदाजीत अजिंक्य रहाणे, कॅमरुन ग्रीन, फिन एलेन, रचिन रविंद्र, रिंकू सिंग, रोवमॅन पॉवेल, अंगरीश रघुवंशी असे नामाकिंत फलंदाज आहेत. गोलंदाजीत सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, मथीशा पथिराना, उमरान मलिक, ब्लेसिंग मुझारबानी असे नामांकित गोलंदाज आहेत. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. मुंबईचे वानखेडे स्टेडियम फलंदाजीसाठी अनुकूल मानले जाते. मुंबई इंडियन्सला कोलकता नाइट रायडर्स कशी काय टक्कर देते पाहूया.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून