Lock Down in Pakistan : पाकिस्तानची दयनीय अवस्था, युद्धामुळे लागले 'लॉकडाउन'; शहबाज सरकारचा निर्णय

इस्लामाबाद : इराण अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक देशांची तेलवाहू, गॅस वाहू जहाजे ही होर्मूझच्या सामुद्रधुनीत अडकले, आणि देशभर लोकांच्या गॅस आणि तेलाचे वांदे झाले. याच गॅस टंचाईचा सर्वात मोठा फटका हा भारताच्या शेजारील देशाला पाकिस्तानला बसला आहे. इतकी घसरली, अवस्था इतकी दयनीय झाली की पाकिस्तान सरकारने स्मार्ट लॉकडाउन हे लागू केले आहे.



पाकिस्तानमधील लॉकडाऊन


स्मार्ट लॉकडाऊन याची अंमलबजावणी ४ एप्रिल पासून केली जाणार असून शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून रविवारी रात्री पर्यंत अनेक निर्बंध लागू होणार आहेत.तसेच मोटरवे आणि हायवेवर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे,



तेल आणि गॅस संकटामुळे निर्णय


इराण अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धानंतर अनेक देशानं तेल आणि गॅस संकटाचा सामना हा करावा लागला, परंतु पाकिस्तानवर याचा भयंकर परिणाम झाल्याचे दिसून आले. आधीच महागाई आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानवर तेल आणि गॅस चे संकट ओढावल्याने या देशाचा दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्तिथी झाली आहे. एलपीजी, पेट्रोल, आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली असून याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चावर होत आहे.



एलपीजी दरात मोठी वाढ


ऊर्जा संकटाचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर झाला आहे. ११.६७ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत सुमारे ३९०० रुपयांवरून वाढून ५१३५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे घरगुती वापरासोबतच एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा, बस आणि मिनीबसच्या भाड्यातही वाढ झाली आहे.



सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण


दरवाढ आणि इंधन टंचाईमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, विशेषतः निम्न आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठ्या आर्थिक ताणाचा सामना करावा लागत आहे. वाहतूक खर्च वाढल्याने वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.


ऊर्जा संकट, महागाई आणि राजकीय दबाव या तिहेरी संकटात सापडलेल्या पाकिस्तानसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारेल की पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी डबघाईला येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



सोशल मीडियावर ही बातमी खोटी असल्याचा दावा


अताउल्लाह तारड यांनी सांगितले की त्या नोटिफिकेशनमध्ये वीज आणि इंधन बचतीसाठी आठवड्यात दोन दिवस स्मार्ट लॉकडाउन लागू करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच हे प्रस्ताव आझाद काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान सरकारांकडे पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.मात्र, अताउल्लाह तारड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की या सर्व बातम्या खोट्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रांतांची संमती मिळाल्यानंतरच पाकिस्तानमध्ये लॉकडाउनसंबंधी कोणतेही अधिकृत नोटिफिकेशन जारी केले जाईल.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे