रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हैदराबादवर विक्रमी विजय

बंगळुरू : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपणच चॅम्पियन असल्याच्या थाटात खेळ केला. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्याच सामन्यात त्यांनी घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला.आरसीबीने यापूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सहा प्रयत्नांत केव्हाच १९० हून अधिक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला नव्हता, पण आज त्यांनी हा कटू इतिहास पुसून टाकला. देवदत्त पडिक्कल व विराट कोहली यांची आक्रमक शतकी भागीदारी सामन्याला एकतर्फी करणारी ठरली.

आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात पहिल्या डावात बरेच कलाटणी देणारे क्षण ठरले. जोश हेझलवूडच्या जागी संधी मिळालेल्या जेकब डफीने ३ विकेट्स घेत हैदराबादची अवस्था ३ बाद २९ अशी दयनीय केली. पॉवर प्लेमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला ३ बाद ४९ धावाच करता आल्या. कर्णधार इशान किशन व हेनरिच क्लासन या दोघांनी आरसीबीच्या हातून सामना खेचून नेला. या दोघांनी ५३ चेंडूंत ९७ धावांची भागीदारी करून हैदराबादला पुनरागमन करून दिले.

पण, रोमारिओ शेफर्डने १४व्या षटकात ही जोडी तोडली. क्लासन ३२ धावांवर माघारी परतला, परंतु फिल सॉल्टने घेतलेला झेल वादग्रस्त ठरला. त्यानंतर १६व्या षटकात इशानचा अविश्वसनीय झेल सॉल्टने टिपून सामन्याला पुन्हा कलाटणी दिली. इशान ३८ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८० धावांवर बाद झाला. इशान बाद झाला तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या १५५ धावा होत्या आणि ते जास्तीत जास्त १८० पर्यंत पोहोचतील असे वाटले होते. मात्र, अनिकेत वर्माने १८ चेंडूंत ४३ धावा चोपून संघाला ९ बाद २०१ धावांपर्यंत पोहोचवले.

डफी व रोमारिओ शेफर्ड यांनी प्रत्येकी ३ बळी टिपले, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग व सुयश शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. आरसीबीची सुरुवात काही खास झाली नाही आणि दुसऱ्या षटकात जयदेव उनाडकटने विकेट घेतली. फिल सॉल्ट ( ८) याचा झेल टिपण्यासाठी क्लासन व अनिकेत दोघंही पळाले, दोघांची टक्कर होता होता वाचली. पण, क्लासनने यशस्वी झेल टिपला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या देवदत्त पडिक्कलचे वादळ घोंगवाले.
त्याने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, जे आरसीबीकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. २०२४ मध्ये हैदराबाद येथे रजत पाटीदारने १९ चेंडूंत फिफ्टी केली होती. देवदत्त व विराट कोहली, ही जोडी सामना जिंकून देईल असेच वाटले. पण, ४५ चेंडूंत १०१ धावांची ही भागीदारी ९व्या षटकात तुटली. देवदत्त २६ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. आरसीबीने १० षटकांत २ बाद १२६ धावा केल्या आणि ही या संघाची पहिल्या दहा षटकांतील तिसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. कर्णधार रजत पाटीदारने १२ चेंडूंत ३१ धावा चोपून विराटसह २२ चेंडूंत ५३ धावा जोडल्या.

डेव्हिड पायनेने सलग दुसऱ्या चेंडूवर जितेश शर्माला बाद करून आरसीबीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. डेव्हिडची हॅटट्रिक हुकली. विराटने ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याचे हे आयपीएलमधील ही त्याची आयपीएलमधील ६४ वे अधर्शतक ठरले. आरसीबीने ६ विकेट्स राखून ही मॅच जिंकली. विराट ३८ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावांवर नाबाद राहिला.
Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून