उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम देवीचा पाडा येथील गावदेवी मंदिर सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षातील डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी अनेक शिवसैनिकासह भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.


यावेळी भाजपा कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे,भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, नंदू म्हात्रे, हृदयनाथ भोईर, सचिन चिटणीस, जुनी डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील, ज्योती पाटील यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टी पक्षावर विश्वास ठेवत अनेकजण प्रवेश करत आहेत. देशाचा विकास हाच भारतीय जनता पार्टीचा ध्यास असल्याने अनेक जण पक्ष्यात प्रवेश घेत आहेत.


तर भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीत अजून अनेकजण प्रवेश करतील असा मला विश्वास आहे. प्रकाश तेलगोटे यांनी प्रवेशानंतर थेट ठाकरेंची शिवसेनेवर निशाणा साधला. ठाकरेंची शिवसेना पक्षात काम करताना माझ्यावर अन्याय झाला. मला कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. ठाकरेंची शिवसेना पक्षात स्थानिक राजकारण होत असल्याचा आरोपहि तेलगोटे यांनी यांनी केला.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला