नवी मुंबईत ‘इस्रो शास्त्रज्ञ’ बनून फसवणूक; महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची लूट

नवी मुंबई : स्वतःला इस्रो शास्त्रज्ञ असल्याचे भासवून उच्चभ्रू महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमसंबंधांच्या आमिषाने महिलांना जाळ्यात ओढत आर्थिक आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.



बनावट ओळख, मोठ्या पदांचा दावा


मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श म्हात्रे नावाचा आरोपी मूळचा नवी मुंबईतील असून तो केवळ दहावीपर्यंत शिक्षित आहे. मात्र, लग्न जुळवणाऱ्या अ‍ॅप्स आणि संकेतस्थळांवर बनावट प्रोफाइल तयार करून तो स्वतःला कधी इस्रोचा शास्त्रज्ञ, तर कधी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत होता. या खोट्या ओळखीच्या जोरावर तो महिलांशी संपर्क साधत विश्वास संपादन करत होता.



प्रेमाचे आमिष, पैशांची उकळपट्टी


आरोपी उच्चशिक्षित आणि सुस्थितीत असलेल्या महिलांना लक्ष्य करत असे. डॉक्टर, इंजिनिअर, बँक अधिकारी अशा महिलांना लग्नाचे आश्वासन देत तो जवळीक वाढवत होता. त्यानंतर भावनिक गुंतवणूक वाढल्यावर विविध कारणे सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असल्याचे तपासात समोर आले आहे.



अनेक शहरांतील महिलांना जाळ्यात ओढले


ही फसवणूक केवळ नवी मुंबईपुरती मर्यादित नसून ठाणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि यवतमाळ या भागांतील महिलांनाही त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. एका महिलेकडून घेतलेले पैसे दुसऱ्या महिलेसमोर श्रीमंती दाखवण्यासाठी वापरण्याची पद्धत तो वापरात होता.



पोलीस तपासात उघडकीस आला प्रकार


संशयाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा हा संपूर्ण कारनामा समोर आला. अनेक महिलांनी बदनामीच्या भीतीने तक्रार देण्यास कचरल्याचेही समोर आले आहे.पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाइन ओळखी करताना व्यक्तीची पूर्ण खातरजमा करावी. कोणालाही बँक किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये. फसवणूक झाल्यास न घाबरता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

ITR Filing 2026 : देशात आयटीआर भरणाऱ्यांचा विक्रमी आकडा; ७.८ कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : देशात आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष

Chandrashekhar Bawankule : अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला द्या; ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी

ओबीसी महामंडळांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत मार्गी परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढविणार बैठकीत १३

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२