Gayatri Datar : प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, सोशल मीडियावर शेअर केला 'हा' सुंदर व्हिडीओ

मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे.


झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेली अभिनेत्री गायत्री दातार तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार असून लवकरच ती विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच गायत्रीनं आपल्या होणाऱ्या नवऱ्यासह काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिनं आपल्या प्रेमाची कबूली दिली होती. गायत्रीच्या होणार्‍या नवऱ्याचं नाव श्रीकांत चवरे असं आहे.


नुकताच नाटकाच्या टीमनं गायत्रीचं केळवणं केलं असून याचा खास व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत गायत्रीनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'बेस्ट केळवण.. काही बेस्ट माणसांकडून.. आपल्या आयुष्यात अशी कमी माणसं आहेत, कमी वेळात येतात आणि आपलंसं करुन टाकतात'.


सिरिअल किलर नाटकाचे दिग्दर्शक, निर्माते, भाऊ कदम, तेजस, गौरी तसेच संर्पूण टीम खूप खास आहे. प्रणय तेली सर आणि तुमच्या कुटुंबाचंही आभार. केदार देसाई यांच्या कुटुंबाचंही आभार. माझ्या केळवणसाठी इतकी सुंदर तयारी केली, त्याबद्दल आभार, असं तिनं म्हटलं आहे.





या केळवणात मोदक, पुरणपोळी, फिश फ्राय, घावण, माशाचं सार आणि भात असे गायात्रीच्या आवडीचे खास पदार्थ बनवण्यात आले. गायत्रीनं शेअर केलेल्या या सुंदर व्हिडीओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.


Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’