PSL 2026 : शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझा यांच्यावर सुरक्षा नियम तोडल्याचा गंभीर आरोप

पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League 2026) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) संघातील कर्णधार शाहीन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आणि अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा (Sikandar Raza) यांच्यावर गंभीर गैरवर्तनाचे आरोप करण्यात आले आहेत.



अनधिकृत व्यक्तींना प्रवेश :


पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, या दोन्ही खेळाडूंनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत चार अनधिकृत व्यक्तींना खेळाडूंच्या हॉटेलच्या मजल्यावर प्रवेश दिला. इतकेच नव्हे, तर त्या व्यक्तींना कथितरित्या त्यांच्या खोल्यांमध्ये नेण्यात आले आणि ते जवळपास तीन तास तिथेच थांबले.



प्रोटोकॉलचे उल्लंघन :


या घटनेमुळे हॉटेलमधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. लीगचे सीईओ सलमान नसीर यांना पाठवलेल्या पत्रात पोलिसांनी स्पष्ट केले की, संबंधित पाहुण्यांना प्रवेशासाठी परवानगी नव्हती. संघाच्या संपर्क अधिकाऱ्याची विनंतीही दोन वेळा नाकारण्यात आली होती. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांचा विरोध असूनही पाहुण्यांना आत नेण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकाराला “प्रोटोकॉलचे स्पष्ट उल्लंघन” असे संबोधले असून, लीग आयोजकांनी या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


दरम्यान, सिकंदर रझा (Sikandar Raza) याने स्पष्टीकरण देताना सांगितले की, हॉटेलमध्ये आलेले पाहुणे त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र होते. त्यांनी शाहीन आफ्रिदी यांना निर्दोष ठरवत संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आहे.


या वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच कडक भूमिका घेतली आहे. पश्चिम आशियातील तणाव आणि ऊर्जा बचतीच्या कारणामुळे लीगमधील काही सामने प्रेक्षकांविना खेळवले जात आहेत. तसेच खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हॉटेल आणि मैदान परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, की हा वाद सामोपचाराने मिटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून