ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसाने झोपडले; आयटी पार्कमध्ये साचला बर्फ

पुणे : ऐन उन्हाळयात भर दुपारी पावसाने पुण्यात हजेरी लावली. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा पाऊस आणि गारपिटीने पुणेकरांना चांगलेच झोडपून काढले आहे. पुण्यातील आयटी पार्कमध्ये तर चक्क बर्फ साचला.


महाराष्ट्र हवामान विभागाने राज्यात काही दिवस पावसाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना हवामान बदलाचा त्रास हा सहन करावा लागणार आहे. पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली. दुपारी अचानक वातावरणात बदल झाला, ढग दाटून आले, सोसाट्याचा वर सुरु झाला, आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या कोसळधार सोबत काही ठिकाणी गारपिटही पडली.


पुण्यातील हा पावसाचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. गारपीट , मुसळधार पाऊस, जोरदार वारे यामुळे पुणेकरांची त्रेधातिरपीट उडाली आहे. पावसामुळे काही ठिकाणी प्रचंड पाणी साचले, पुण्यातील हिंजवडी या आयटी पार्कमध्ये इतकी गारपीट झाली की पुणे नसून कुठल तरी थंड प्रदेशातील ठिकाण आहे असे भासत आहे. पुण्याच्या आयटी पार्कचा तो व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.



पुण्यात नेमका कुठे-कुठे पाऊस पडला?


पुण्यात आज (३० मार्च २०२६) दुपारी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि भोर तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लावली. बाणेर, बालेवाडी, औंध, कोथरूड आणि सिंहगड रोड परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला, तर काही ठिकाणी गारपीटही झाली.


पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुढील काही तास शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी