२४ लाख ७३ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा

३० जूनआधी प्रक्रिया पूर्ण करणार; राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा अहवाल तयार


मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने'च्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने थकबाकीदार शेतकऱ्यांचा सविस्तर अहवाल तयार केला असून, यामुळे सुमारे २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. ३० जूनपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. विशेष म्हणजे, केवळ पीककर्जच नव्हे, तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही यात समावेश करण्यात आला असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.


बँकर्स कमिटीच्या अहवालानुसार, राज्यातील १ कोटी ३३ लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे २४ लाख ७३ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे एकूण ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात सोलापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि अहिल्यानगरसह एकूण १४ जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.



नेमके निकष काय?


या कर्जमाफीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे, फक्त थकीत पीककर्जच माफ होईल असा निकष सरकारने ठेवलेला नाही. अनेक शेतकऱ्यांचे पीककर्ज नियमित असले तरी शेतीसाठी घेतलेले मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज थकले आहे. अशा शेतकऱ्यांनाही दोन लाखांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. पीककर्ज परतफेडीची मुदत ३० जून असते, त्याआधीच ही प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याची संधी दिली जाईल, असे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये