Trump : ट्रम्पचे विमान सापडले संकटात, नागरी विमान जवळ येऊ लागताच अमेरिकेच्या हवाई दलाने केली धावपळ

फ्लोरिडा : पश्चिम आशियातील युद्धामुळे जगात तणावाचे वातावरण असताना फ्लोरिडाच्या आकाशात धक्कादायक घटना घडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'एअर फोर्स वन' विमानाच्या एक नागरी विमान येत असल्याचे दिसले. यामुळे नागरी विमानाकरवी एअरफोर्स वनला धडक देण्याचा किंवा एअरफोर्स वन वर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका अनेकांच्या मनात चुकचुकली. यानंतर अमेरिकेच्या हवाई दलाने केली धावपळ करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत फ्लोरिडाच्या आकाशात तणावाची स्थिती होती.


आकाशात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'एअर फोर्स वन' विमानाच्या आसपास कोणत्याही विमानाला येण्यास सक्त मनाई आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी ही व्यवस्था आहे. पण एका नागरी विमानाने या विमानाचे उल्लंघन केले. रविवारी ही घटना घडली आणि फ्लोरिडाच्या पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलर्ट आला. खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकेच्या हवाई दलाच्या एफ १६ विमानांनी लगेच उड्डाण केले आणि नागरी विमानाला नियंत्रण कक्षाने इशारा देऊन 'एअर फोर्स वन' विमानापासून तातडीने दूर होण्याचे निर्देश दिले. इशारा देण्यासाठी आकाशात फ्लेअर्स सोडण्यात आले. 'द न्यूयॉर्क पोस्ट'ने हे वृत्त दिले आहे. नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडच्या (NORAD) विमानांनी जनरल एव्हिएशन विमानाला अडवेपर्यंत अधिकाऱ्यांनी विमानतळावर विमान उड्डाणबंदी लागू केली होती, असेही 'द न्यूयॉर्क पोस्ट'च्या वृत्तात नमूद आहे.


चूक झाल्याची जाणीव होताच नागरी विमानाच्या वैमानिकाने माफी मागितली आणि तातडीने 'एअर फोर्स वन'पासून दूर जाण्यास सुरुवात केली. यामुळे परिस्थिती धोकादायक नसल्याचे सर्वांच्या लक्षात आले.


आकाशात सोडलेले फ्लेअर्स हे फक्त इशारा देण्यापुरते होते. ते आकाशातच थोड्या वेळाने विझले त्यामुळे जमिनीवर कोणताही धोका उरला नाही. नागरी विमानाने नियंत्रण कक्ष तसेच एफ १६ विमानांच्या संपर्कात राहून 'एअर फोर्स वन'पासून दूर जाण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात नागरी विमान 'एअर फोर्स वन'पासून दूर त्याला सांगितलेल्या सुरक्षित मार्गावरून जाऊ लागले. यानंतर 'एअर फोर्स वन'चा पुढील प्रवास सुरू झाला. ही संपूर्ण घटना स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी सव्वाच्या सुमारास घडली. डिफेन्स व्हिज्युअल इन्फॉर्मेशन डिस्ट्रिब्युशन सर्व्हिसने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


फ्लोरिडाच्या आकाशात घडलेल्या घटनेनंतर सर्व नागरी विमानांसाठी अमेरिकेने सुरक्षेचे तसेच खबरदारीचे काही नवे निर्देश जारी केले. नागरी विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क का तुटला आणि ते विमान 'एअर फोर्स वन'च्या जवळ का गेले याची तज्ज्ञ समिती चौकशी करत आहे. अहवाल येताच नियमानुसार दोषींवर कारवाई केली जाणार आहे, असे अमेरिकेच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाने सांगितले.


ज्यावेळी आकाशात तणावाची स्थिती निर्माण झाली त्यावेळी 'एअर फोर्स वन'मध्ये ट्रम्प नव्हते. ते इंटरनॅशनल गोल्फ कोर्सवर होते. ट्रम्प यांना परत वॉशिंग्टनला घेऊन जाण्यासाठी म्हणून 'एअर फोर्स वन' फ्लोरिडाच्या पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत होते.

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन