चंद्रपूर जिल्ह्यासाठी १ व ३ एप्रिल रोजी येलो तर २ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी

चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक १ व ३ एप्रिल २०२६ रोजी येलो अलर्ट तर २ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी ४० ते ५० किमी वेगाने) तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


दरम्यान, काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.


संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्याच्या वेळी घरात सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. खिडक्या व दरवाजांपासून दूर राहावे तसेच सखल भाग, अंडरपास, ड्रेनेज परिसर किंवा पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. खराब दृश्यमानतेमुळे पावसात वाहन चालवणे टाळावे आणि विजेच्या तारांपासून तसेच पॉवर लाईन्सपासून दूर राहावे.


वादळ व विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षित इमारतीचा आसरा घ्यावा. उंच झाडाखाली, लोखंडी वस्तूजवळ किंवा तात्पुरत्या शेडमध्ये थांबू नये. घरात असताना विद्युत उपकरणे बंद ठेवावीत, लँडलाईन फोनचा वापर टाळावा तसेच पाण्याच्या संपर्कात येणे टाळावे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, महाकाली यात्रेदरम्यान जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांनीही हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. यात्रेसाठी आलेल्या भक्तांनी निवारा क्षेत्राच्या अधिक माहिती करिता मंदिर परिसरातील नियंत्रण कक्षा भेट देऊन अधिक माहिती घ्यावी.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी