Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.



नेमकं प्रकरण काय?



मंगळवारी, नालंदा जिल्ह्यातील दिपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माघरा गावातील शीतला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. पूजेदरम्यान गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरी झाली.


घटनेची माहिती मिळताच, दीपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले.



प्रत्यक्षदर्शीने काय सांगितले?



घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका तरुणाने सांगितले, "आज सकाळपासून मंदिरात भाविकांची गर्दी होती. याच दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण मरण पावले आणि बरेच जण जखमी झाले. सर्व काही सुरळीत सुरू होते. अचानक चेंगराचेंगरी झाली आणि असे का घडले हे कळले नाही. लोक इकडेतिकडे धावू लागले. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी बॅरिकेड आणि रांगा लावल्या होत्या. गर्दीच्या सुरक्षेसाठीही लोक उपस्थित होते. पण मला माहीत नाही की कोणी गोंधळ घातला आणि लोक इकडेतिकडे धावू लागले. ही जत्रा शतकानुशतके सुरू आहे. प्रत्येक वेळी सर्व काही सुरळीत पार पडते. यावेळी ही चेंगराचेंगरी कशी झाली हे मला माहीत नाही."


ज्या शीतला मंदिरात ही चेंगराचेंगरी झाली, ते बिहार शरीफमधील नालंदा जिल्ह्यातील माघरा येथे आहे. मंगळवारी, माघरा येथील शीतला मंदिरात हजारो लोक दर्शनासाठी जमले होते. दरवर्षी गर्दी होते, पण असा अपघात यापूर्वी कधीही घडला नव्हता. पोलीस आता या चेंगराचेंगरीचा आणि त्यामागे काही कट आहे का याचा तपास करत आहेत.

Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी