Iran-US-Israel War : समुद्रात भीषण हल्ला! दुबईतील तेलवाहू जहाजावर इराणकडून मोठा हल्ला

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाने (Iran-US-Israel War) आता आणखी धोकादायक वळण घेतले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाला एक महिना उलटूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. उलट, या संघर्षामुळे जागतिक स्तरावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


अमेरिकेकडून इराणला (Iran) स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर युद्धबंदीचा प्रस्ताव मान्य केला नाही, तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर थेट हल्ले केले जातील. त्याला प्रत्युत्तर देताना इराणनेही कठोर भूमिका घेतली असून, “आमच्या प्रकल्पांवर हल्ला झाला तर आम्हीही अमेरिकेशी संबंधित सर्व ऊर्जा केंद्रांवर हल्ले करू,” असा थेट इशारा दिला आहे.


दरम्यान, या संघर्षामुळे कच्चे तेल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. काही देशांमध्ये आणीबाणी किंवा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि गॅस सुविधांवर सतत हल्ले होत असल्याने जागतिक ऊर्जा संकट अधिकच गडद झाले आहे.


गेल्या २४ तासांत इराणवर १०० हून अधिक हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. दुबई, सौदी अरेबिया, कतार आणि कुवेत यांसारख्या देशांनाही या संघर्षाचा मोठा फटका बसत आहे.


याच पार्श्वभूमीवर दुबईजवळ (Dubai) समुद्रात मोठी घटना घडली. इराणकडून एका तेलवाहू जहाजावर (oil tanker) भीषण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात तेल समुद्रात सांडले, ज्यामुळे पर्यावरणीय आणि आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या घटनेने आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे.


यापूर्वीही इराणकडून दुबईतील तेल रिफायनरीवर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे या भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


दरम्यान, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती आधीच उच्चांकी पातळीवर असताना या नव्या हल्ल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. इराणने काही दिवसांपूर्वीच दावा केला होता की, जागतिक तेलबाजारावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता फक्त त्यांच्याकडेच आहे.


एकूणच, इराण-अमेरिका संघर्षामुळे (Iran-US-Israel War) जगासमोर मोठे ऊर्जा आणि आर्थिक संकट उभे राहिले असून पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

Comments
Add Comment

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी

बिश्केक : २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

USS Abraham Lincoln : थायलंडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! ५ हजार अमेरिकन सैनिकांच्या आगमनापूर्वी पटायातील देहव्यापारावर धाडी

पटाया : थायलंडचे प्रसिद्ध पर्यटन शहर असलेल्या पटाया (Pattaya) मध्ये सध्या पोलिसांकडून देहविक्री करणाऱ्या महिला आणि

PM Modi SCO Summit 2026 : दहशतवादावर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट संदेश; ‘दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड नको’

बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

Nepal Flood Rescue : नेपाळ-तिबेट पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी संपर्क नाही; शोधासाठी केंद्राचे विशेष पथक काठमांडूत दाखल

नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही