Mumbai Local Mega block Update : मुंबईत अचानक 'इतक्या' लोकल फेऱ्या झाल्या रद्द, आता शेवटचीही गाडी सुटणार 'या' वेळेवर

मुंबई : मुंबईत सध्या लोकलचे वेळापत्रक हे बिघडलेलं दिसत आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत आणि बऱ्याच गाड्या या उशिराने येत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय उशिरा येणाऱ्या लोकलमुळे स्थानकावर प्रचंड गर्दी देखील वाढत आहे. त्यामुळे ट्रेनमध्येही गर्दी वाढलेली दिसत आहे.



नेमकं कारण काय?


मुंबईच्या प्रभादेवी उड्डाणपुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वेवर रात्रीच्या वेळेत ब्लॉक घेतले जात आहेत, म्हणून अनेक लोकल गाड्या या उशिराने धावत आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलले गेले आहेत. त्यामुळे याचा त्रास हा थेट नोकरदार वर्गावर आणि प्रवाशांवर होत आहे



बदल केव्हापासून आणि किती वाजता असेल


प्रभादेवीचा उड्डाणपूल हा वरळी- शिवडी प्रकल्पाचा भाग असलेला ब्रिटिशकालीन पूल आहे. जो तब्बल ११३ वर्ष जुना आहे. हा पूल पाडून त्याजागी नवीन डबलडेकर पूल उभारण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( MMRDA ) यांनी केले आहे. शिवाय या कामाची जबाबदारी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडे आहे.



ब्लॉक केव्हापासून होईल सुरु


या पाडकामासाठी सोमवार पासून ( ३० मार्च पासून ) मध्य रेल्वेवर दररोज रात्री ब्लॉक हा घेतला जात आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ११ : ४० ते पहाटे ३ : ४० या वेळेत सुमारे चार तासांचा हा ब्लॉक असणार आहे. या काळात अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील काही गाड्या पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. शनिवारी मात्र मध्यरात्रीनंतर सलग सहा तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार असून काम लवकरात लवकर आटोपण्याचे नियोजन आहे.



लोकल फेऱ्यांमध्ये केले गेले हे बदल


या ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम सीएसएमटी, कुर्ला, आणि ठाणे दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांवर होणार आहे. काही लोकल गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत. तर काहींचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. कल्याण, कसारा आणि खोपोलीकडून येणाऱ्या काही गाड्या कुर्ला, ठाणे, किंवा दादरपर्यंतच धावणार आहेत. काही गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर स्थानकातूनच चालवण्यात येणार आहेत.


याशिवाय, शेवटच्या लोकलच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवरही या कामाचा परिणाम होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.


वाढत्या उन्हाचा तडाखा आणि बिघडलेले लोकलच वेळापत्रक, स्टेशनवर होणारी गर्दी त्यामुळे कामावर जाणाऱ्या आणि रात्री घरी परतणाऱ्या नोकरदारांची चांगलीच कसरत होणार आहे. काम पूर्ण होईपर्यंत काही काळ मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळ राखून नियोजन करावे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने