Bigg Boss Marathi 6 : विशालनं वैयक्तिक मर्यादा ओलांडल्या, राकेशच्या कुटुंबियांनी रितेश देशमुखकडे केली मोठी मागणी

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा अनेक वादग्रस्त गोष्टींमुळे सतत चर्चेत आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात आणखीन एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगत आहे. बिग बॉस मराठी आता अंतिम टप्प्यात पोहचले असून हा शो संपायला थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत.


अशातच बिग बॉसमध्ये नुकताच एक नॉमिनेशन टास्क पार पडला. यादरम्यान स्पर्धक विशाल आणि राकेशमध्ये टोकाचं भांडण झालं असल्याचं पाहायला मिळालं. यामुळे बिग बॉसच्या घरातलं वातावरण अधिक तापलं.  धक्काबुक्की देखील झाली. या भांडणात विशाल थेट राकेशच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये झालेल्या वादामुळे घरातील वातावरण बिघडलं होतं. अनेकांनी या गोष्टीचा विरोध केला. यावेळी विशालच्या या कृत्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून आता राकेशच्या कुटुंबानंदेखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल राकेशच्या कुटुंबानं एक निवेदन जारी केलं. तसेच होस्ट रितेश देशमुखकनं या प्रकरणाला गांभीर्यानं घ्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.


या संपूर्ण प्रकरणाबाबत राकेशच्या कुटुंबानं एक निवेदन जारी केलं आहे. सोशल मीडियावरही हे निवेदन त्यांनी शेअर केलं आहे. या निवेदनात राकेश बापटच्या कुटुंबानं म्हटलं आहे की, 'आम्ही राकेश बापटचे कुटुंब. बिग बॉस मराठी सिझन ६ मध्ये विशाल कोटियनकडून घडलेल्या घटनेबाबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु इच्छित आहोत. विशालनं इतर व्यक्तींच्या वैयक्तिक बाबींचा उल्लेख केला आहे. जे कराराचा स्पष्ट भंग आहे. या कारणामुळे आम्ही सार्वजनिकरित्या या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो'.


'बिग बॉस या शोचे सुत्रसंचालक रितेश देशमुखमुळे हा शो सुसंस्कृत आणि एकत्रित कुटुंबासोबत पाहण्यायोग्य आहे. बिग बॉसच्या घरात संपूर्ण प्रवासात राकेशनं नेहमी संयम आणि प्रतिष्ठा राखली. त्यानं कधीही कोणत्याही वैयक्तिक कारणांवरुन कुणाचीही अवहेलना केलेली नाही', असं राकेशच्या कुटुंबानं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.


'बिग बॉसच्या नियमानुसार तसेच कायदेशीर करारानुसार, स्पर्धकांना वैयक्तिक बाबींवर चर्चा करणं तसेच लक्ष्य करणं सक्त मनाई आहे. जर अशा प्रकारची घटना घडली, तर गंभीर कारवाई होऊ शकते. ज्यात शोमधून स्पर्धाकाला बाहेर काढण्याचाही समावेश आहे. विशालनं हे नियम वारंवार मोडले. सुरुवातीपासून असं सुरू आहे. हे गंभीर असून, अस्वीकार्य भंग आहे', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.





'चाहत्यांमध्ये सध्या प्रचंड नाराजी आहे. कलर्स, बिग बॉस मराठी आणि एंडेमॉलशाइन यांच्या प्रयत्नाचं आम्ही कौतुक करतो. दरम्यान, महाराष्ट्रातील लाखो कुटुंबाकडून पाहिल्या जाणाऱ्या प्रेक्षकांना योग्य उदाहरण घालून द्यावं, अशी आमची विनंती आहे. तसेच बिग बॉसचे सुत्रसंचालक रितेश देशमुखनेही या शोमध्ये होत असलेल्या उल्लंघनांची गांभीर्यानं दखल घ्यावी', असंही राकेशच्या कुटुंबानं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये घडलेल्या या प्रकरणावर चाहतेही संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’