Canada : कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या

कॅनडातील सरे शहरात भारतीय वंशाच्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख २७ वर्षीय जसमन सेखों अशी झाली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा हल्ला संघटित गुन्हेगारी अर्थात गँगवॉरशी संबंधित असू शकतो. पोलिसांना संशय आहे की हल्लेखोरांनी पूर्वनियोजित कट रचून ही घटना घडवून आणली.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सुलिव्हन हाइट्स येथील एका टाउनहाऊस कॉम्प्लेक्समध्ये घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, एका काळ्या एसयूव्हीने जसमन यांचा पाठलाग केला. त्यानंतर गाडीतून दोन जण खाली उतरले आणि त्यांनी जसमन यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जसमन यांचा मृत्यू झाला होता.तपास पथकाच्या माहितीनुसार, जसमन यांचा यापूर्वीही पोलिसांशी संपर्क आला होता आणि त्यांचा अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार संघटित गुन्हेगारी आणि गँगवॉरशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे.


घटनास्थळाजवळ पोलिसांना एक जळती कारही आढळून आली असून, हल्लेखोरांनी या वाहनाचा वापर केला होता का याचा तपास सुरू आहे. सरे शहरात मागील ४८ तासांत गोळीबाराची ही चौथी घटना असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.