IPL 2026 : पदार्पणाच्या सामन्यातच कॉनॉलीचा ‘वन-मॅन शो’; पंजाबचा गुजरातवर ३ विकेट्स राखून विजय

आयपीएल २०२६ ची दमदार सुरुवात करत पंजाब किंग्सने न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून रोमांचक विजय मिळवला. या विजयाचा खरा हिरो ठरला कूपर कॉनॉली. ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर कूपर कॉनॉली याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच नाबाद ७२ धावांची झंझावाती खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.



गुजरातची चांगली सुरुवात, पण मधल्या फळीत घसरण :


गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी डावाची चांगली सुरुवात केली. दोघांनी संघाला वेगवान सुरुवात दिली, मात्र मोठी भागीदारी उभी राहिली नाही. मार्को यानसनने सुदर्शनला १३ धावांवर बाद करत पहिला धक्का दिला, तर युजवेंद्र चहलने ३९ धावांवर शुभमन गिलला माघारी पाठवत गुजरातला मोठा फटका दिला.


यानंतर जॉस बटलर (३८) आणि ग्लेन फिलिप्स (२५) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण वैशाक विजयकुमार आणि चहलच्या अचूक गोलंदाजीसमोर गुजरातची फलंदाजी डळमळली. शेवटी राहुल तेवतियाच्या छोटेखानी खेळीच्या जोरावर गुजरातने २० षटकांत ६ बाद १६२ धावा केल्या.



कॉनॉली-प्रभसिमरनची भागीदारी :


१६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात धक्कादायक झाली. प्रियांश आर्या लवकर बाद झाला. यानंतर प्रभसिमरन सिंह (३७) आणि कूपर कॉनॉली याने आक्रमक फलंदाजी करत संघाला सावरलं. दोघांच्या भागीदारीमुळे पंजाबने पॉवरप्लेमध्ये ५५ धावा केल्या.



११०/३ वरून ११८/६… सामना गुजरातच्या बाजूने झुकला!


मात्र मधल्या षटकांत पंजाबचा डाव कोसळला. श्रेयस अय्यर (१८), नेहाल वढेरा (३), शशांक सिंह (४) आणि मार्कस स्टोइनिस (०) झटपट बाद झाले.
११०/३ वरून पंजाब ११८/६ अशा बिकट अवस्थेत पोहोचला आणि सामना गुजरातच्या बाजूने झुकला.



कॉनॉलीचा ‘वन-मॅन शो’ :


संकटाच्या क्षणी कूपर कॉनॉलीने जबाबदारी घेतली आणि शेवटपर्यंत नाबाद राहत ४४ चेंडूत ७२ धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या शानदार खेळीमुळे पंजाबने सामना जिंकत आयपीएल २०२६ मध्ये विजयी सलामी दिली.



अर्शदीप सिंगच्या नावावर नकोसा विक्रम:


मात्र अर्शदीप सिंग पंजाबकडून सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने १०.५० च्या इकोनॉमी रेटने ४२ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली. शेवटचं षटक टाकायला आलेल्या अर्शदीप सिंग याने तब्बल ११ चेंडू टाकले, कारण त्याने ४ वाइड आणि १ नो-बॉल दिला. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी ओव्हर टाकण्याचा नकोस विक्रम अर्शदीपच्या नावावर कोरला गेला.



गोलंदाजीत कोण चमकले?


गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने ३ बळी घेतले, तर कगिसो रबाडा, राशिद खान, वॉशिंग्टन सुंदर आणि अशोक यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. एकंदरीत, सामना पूर्णपणे चुरशीचा झाला, पण शेवटी कॉनॉलीच्या धडाकेबाज खेळीने पंजाब किंग्सने विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त