Raja Shivaji : अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली, 'राजा शिवाजी' सिनेमाचा टीझर रिलीज

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखचा ( Riteish Deshmukh ) बहुप्रतिक्षित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सिनेमा राजा शिवाजी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा सिनेमा येत्या १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार असून नुकताच या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सिनेमाचा हा टीझर पाहून अनेकांच्या अंगावर शहारा अल्याशिवाय राहणार नाही.


या सिनेमात अनेक दिग्गज कलाकार झळकणार असून मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा या सिनेमात घेण्यात आला आहे. सिनेमाची निर्मिती जेनेलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे.


'राजा शिवाजी' (Raja Shivaji) सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, त्याग आणि दूरदृष्टीचा गौरव करणारा सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या स्वराज्याच्या लढ्याची गाथा या सिनेमातून प्रभावीपणे मांडली जाणार आहे. या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्याकडे असून नामांकित छायाचित्रकार संतोष शिवन या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.


या सिनेमात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन हे दिग्गज कलाकार भूमिका साकारणार असून अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. याचा पहिला लूक पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. टीझरमध्ये रितेशला महाराजांच्या भूमिकेत पाहिल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. तर, त्याची पत्नी जेनेलिया देशमुख या सिनेमात सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे.


या टीझरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून यामध्ये झळकणाऱ्या दिग्गज कलाकारांच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक केलं जात आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाच्या टीझरला अवघ्या पंधरा तासांत ६ लाख ३७ हजार ८४७ व्ह्यूज मिळाले आहेत.


जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित हा सिनेमा मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून पोस्टरमधील रितेशचा लूक पाहून हा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह प्रचंड वाढला आहे.


Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’