Russia Plane Crash : सैन्याच्या वाहतूक विमानाचा मोठा अपघात; २९ जणांचा मृत्यू

रशियाच्या क्रीमिया येथे एक भीषण विमान अपघात (Russia Plane Crash) घडला असून यात तब्बल २९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, एंटोनोव-२६ हे सैन्याचे वाहतूक विमान कोसळले.


मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, ३१ मार्च रोजी संध्याकाळी (स्थानिक वेळेनुसार सुमारे ६ वाजता) हा अपघात झाला. विमान नियमित उड्डाणावर असताना अचानक त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. शोध आणि बचाव पथकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर अपघातग्रस्त (Russia Plane Crash) ठिकाणाचा शोध लावला.


घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, विमानात ६ कर्मचारी सदस्य आणि २३ प्रवासी होते. या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला. प्राथमिक तपासात विमानाच्या अवशेषांवर बाह्य हल्ल्याचे कोणतेही चिन्ह आढळलेले नाही. त्यामुळे तांत्रिक बिघाड हे अपघाताचे (Russia Plane Crash) संभाव्य कारण असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे. या अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे