विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर संधी मिळावी, यासाठी भाजपमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यंदा १३ मे रोजी रिक्त होणाऱ्या ९ पैकी ४ जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. अशावेळी राज्यसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या नेत्यांनी आता आपले संपूर्ण लक्ष विधान परिषदेवर केंद्रित केले असून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतल्याचे समजते.


विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर, एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भाजपात असलेल्या इच्छुकांच्या लांबलचक यादीमुळे उमेदवारी कोणाला द्यायची, असा पेच पक्ष नेतृत्वासमोर निर्माण झाला आहे.


भाजपचे रणजीतसिंह मोहिते-पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. पक्षाच्या धोरणानुसार यातील किती जणांना पुन्हा संधी मिळते आणि किती जणांचा पत्ता कट होतो, यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. विशेषतः प्रादेशिक समतोल आणि जातीचे समीकरण पाहता पक्ष नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देणार की जुन्यांनाच कायम ठेवणार, याची उत्सुकता वाढली आहे.


इच्छुकांची यादी : भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र उपाध्यक्ष केशव उपाध्ये, माधवी नाईक यांसारख्या संघटनात्मक नेत्यांसोबतच रणजीतसिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय, महायुतीच्या जागावाटपामुळे विधानसभेत ज्यांना संधी मिळू शकली नाही, अशा मातब्बर नेत्यांनीही फिल्डिंग लावली आहे. अशावेळी पक्षासाठी वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणाऱ्यांना संधी द्यायची की निवडणुकीतील गणिते पाहून नवीन उमेदवारांना मैदानात उतरवायचे, यावरून भाजपात सध्या खल सुरू आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवस भाजपातील 'वेटिंग लिस्ट'मधील नेत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे