Hrithik Roshan Divorce : 'या' कारणामुळे हृतिक आणि सुझाननं घेतला घटस्फोट, अभिनेता जायेद खाननं केला खुलासा

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) नुकताच पुतण्याचा लग्नातील डानसमुळे चर्चेत आला होता. हृतिक डान्स आणि अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही सतत चर्चेत असतो. त्याच्या आणि सुझान खानच्या (Sussanne Khan) नात्याविषयी कायम चर्चा रंगलेली असते. विशेष म्हणजे दोघांच्या घटस्फोट याविषयी अनेकदा बोललं जातं.


१४ वर्षांच्या संसारानंतर ऋतिक आणि सुझान विभक्त झाले होते. मात्र, अजूनही त्यांच्यातील मैत्री कायम आहे. आपल्या मुलांच्या संगोपनासाठी ते कायम एकत्र येताना दिसतात. ऋतिकनं घटस्फोट दिला तेव्हा त्याच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वात सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता जायेद खाननं दोघांच्या घटस्फोटावर खुलासा केला आहे.


सुझानचा भाऊ जायेद खाननं नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत दोघांच्या घटस्फोटाचं कारण सांगितलंय. याबाबत बोलताना जायेद म्हणाला " एकत्र राहणं त्यांच्या नशिबात लिहिलं नसावं. तर एखादी गोष्ट टिकणार नसते, त्याला ओढून ताणून धरण्याचा प्रयत्न करणं फार वाईट असतं. यामुळे दोन्ही व्यक्तींना त्रास होतो. हे सगळं कशासाठी ? अखेर तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करायचा असतो, त्यांच्या आयुष्याचा तुम्ही भाग असता, तुम्हाला त्यांना लहानाचं मोठं होताना पाहायचं असतं. ऋतिक आणि सुझानच्या नात्यात असंच झालं. आणि दोघांचा उद्देश मुलांवर लक्ष केंद्रित करणं हा बनला.'


पुढे जायेद म्हणाला ' जे झालं ते झालं. आता सगळं संपलंय. आता तुम्ही तुमच्या भविष्यावर लक्ष द्या. स्वतःचा आनंद शोधा, असा विचार आमच्या कुटुंबानं केला आहे. आम्ही समाजाच्या दबावाखाली जगणारं कुटुंब नाही. आम्ही काही गोष्टींबाबत खूप जागरूक आणि सुशिक्षित आहोत. अनेकांना असं वागणं विचित्र वाटतं, मला माहित आहे . बरेचजण याबद्दल नाराजी व्यक्त करतात. पण ठीक आहे. आम्हाला त्याची काहीही अडचण नाही."


यावेळी जायेद ऋतिकच्या नव्या गर्लफ्रेंड विषयी बोलताना म्हणाला ' दोघांनाही खूप चांगले जोडीदार मिळाले असून सबा खूप चांगली आहे. तर सुजानचा बॉयफ्रेंड अर्सलान माझा धाकट्या भावाप्रमाणे आहे. ज्या परिस्थितीतून या दोघांना जावं लागलं ते मी शब्दात मांडू शकत नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी ही परिस्थिती हाताळली, आपापल्या आयुष्यात प्रगती केली आणि पुन्हा एकदा प्रेमात पडले त्याबद्दल त्यांचा मला आदर वाटतो. कारण ही गोष्ट सोपी नाही.


महत्त्वाचं काय आहे ? तर तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती असावी जिच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता. जर ही व्यक्ती खंबीर नसेल तर या जगात वावरणं खूप कठीण आहे. प्रेम हा खूप व्यापक शब्द आहे. ऋतिक आणि सुजानला एकमेकांबद्दल वाटणारा आदर आणि काळजीही प्रेमापेक्षा जास्त अर्थपूर्ण आहे . असं यावेळी बोलताना सुझानचा भाऊ अभिनेता जायेद खाननं स्पष्ट केलं आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या