यजमान केकेआर पराभूत, हैदराबादचा दणदणीत विजय

कोलकाता : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिच क्लासन व नितीश कुमार रेड्डी यांच्या दमदार फलंदाजीनंतर सनरायर्झस हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. कोलकाता नाइट रायडर्सला सलग दुसऱ्या सामन्यात हार पत्करावी लागली. अंगकृश रघुवंशीने अर्धशतक झळकावले खरे, परंतु इतरांनी निराश केले. हैदराबादच्या गोलंदाजांनी चेंडूचा वेग कमी ठेवून अचूक मारा करून कोलकाताला हतबल केले आणि विजयासह आयपीएल २०२६ गुण तक्तामध्ये सहाव्या क्रमांकावर आगेकूच केली. कोलकाता १० व्या क्रमांकावर घसरला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी इडन गार्डनवर त्यांची ताकद दाखवली. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी ५.४ षटकांत ८२ धावा जोडताना कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजाना हतबल केले. हेड २१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावांवर बाद झाला. त्यानंतर ब्लेसिंग मुझरबानीने एकाच षटकात दोन धक्के दिले. अभिषेक २१ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार लगावून ४८ धावांवर, तर इशान किशन १४ धावांवर बाद झाला. यानंतर सनरायझर्स हैदराबादची धावगती काही काळासाठी मंदावली.


नितीश कुमार रेड्डी ( ३९) व हेनरिच क्लासेन ( ५२) यांच्या ७० धावांनी सनरायझर्स हैदराबादला ८ बाद २२६ धावांपर्यंत पोहोचवले. हैदराबादने आयपीएल २०२६ मध्ये सलग दुसऱ्या सामन्यात दोनशेपार धावा केल्या. ब्लेसिंगने चार विकेट्स घेतल्या. केकेआरला फिन अॅलनने ७ चेंडूंत २८ धावा चोपून दमदार सुरूवात करून दिली, परंतु अजिंक्य रहाणे ( ८) आज अपयशी ठरला. कॅमेरून ग्रीनही दोन धावेवर रन आऊट झाला.


अंगकृश रघुवंशीने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावताना उप कर्णधार रिंकू सिंगसह ४६ धावा जोडल्या होत्या. या सामन्यात २-३ वेळा रन आऊट होता होता वाचणारा रघुवंशी अखेर धावबादच झाला. त्याला २९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतावे लागले. रिंकू या विकेटमुळे निराश झाला. कोलकाता नाइट रायडर्सने ११ षटकांत ४ बाद १२० धावा केलेल्या आणि त्यांना ११७ धावा आणखी करायच्या होत्या.


अनुकूल रॉयला ( ०) १२ व्या षटकात नितीश रेड्डीने माघारी पाठवून कोलकाता नाइट रायडर्सच्या अडचणी वाढवल्या. नितीशने आणखी एक धक्का देताना रिंकूला ( ३५) बाद केले. सुनील नरीनवर आता कोलकाताची सर्व भीस्त होती, पण तो ४ चेंडूंत १२ धावांचे योगदान देऊन बाद झाला. इशान मलिंगाने त्याची विकेट घेतली. मलिंगाच्या त्याच षटकात रमणदीप सिंग ( १०) बाद झाला आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयाच्या आशा मावळल्या. कोलकाता नाइट रायडर्सचा डाव १६ षटकांत १६१ धावांवर गडगडला आणि हैदराबादने ६५ धावांनी विजय मिळवला. जयदेव उनाडकटने ३ विकेट्स घेतल्या.


रिंकू सिंहने घातली विक्रमाला गवसणी : रिंकू सिंहने इंडियन प्रीमियर लीगमध्ये एक मोठा विक्रम रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अनिकेत वर्माचा झेल घेतल्यानंतर त्याने ही कामगिरी केली, जो केकेआरसाठी त्याचा ४१वा झेल होता. इंडियन प्रीमियर लीगमध्ये केकेआरसाठी सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आता रिंकू सिंहच्या नावावर आहे. गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने आधी इशान किशनचा झेल घेतला आणि नंतर अनिकेत वर्माला झेलबाद करण्यात मदत केली. त्याने आता कोलकातासाठी ४१ झेल घेत आंद्रे रसेलचा ४० झेलचा विक्रम मोडला आहे. आयपीएलमध्ये केकेआरसाठी सर्वाधिक ४१ झेल घेण्याचा विक्रम आता रिंकू सिंहच्या नावावर आहे. आंद्रे रसेल ४० झेलसह दुसऱ्या स्थानावर आहे. सुनील नरेननेही कोलकाता नाईट रायडर्ससाठी ३६ झेल घेतले आहेत, तर मनोज तिवारीने तीन वेळच्या आयपीएल विजेत्या संघासाठी ३० झेल घेतले आहेत.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून