मध्य रेल्वेचा शनिवार, रविवार मेगा ब्लॉक; उपनगरीय व मेल-एक्स्प्रेस सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ४ एप्रिल २०२६ रोजी ठाणे व डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्तार तसेच परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यान प्रभादेवी येथील रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) पाडण्याच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे उपनगरीय तसेच मेल-एक्स्प्रेस रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.


रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान प्लॅटफॉर्म विस्तारासाठी ४ ते ५ एप्रिल दरम्यानच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ५ एप्रिल रोजी रात्री १२ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत लागू राहील. या काळात मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली या दरम्यानच्या अप व डाऊन धीम्या मार्गांवरील सेवा बाधित राहतील. परिणामी, ठाणे आणि डोंबिवली स्थानकांसाठीच्या अनेक उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्या अर्ध्या मार्गातच थांबवण्यात येतील.


याचबरोबर, प्रभादेवी येथील आरओबी पॅनल्स काढण्याच्या कामासाठी ४ एप्रिल रोजी रात्री ११:१५ ते ५ एप्रिल रोजी पहाटे ५:४५ या कालावधीत दादर ते भायखळा दरम्यान सर्व मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरदरम्यानच्या उपनगरीय सेवा ४ एप्रिल रोजी रात्री १०:३० पासून ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. ४ एप्रिल रोजी रात्री १०:४९ पासून ते ५ एप्रिल रोजी सकाळी ९:०५ पर्यंतच्या डाऊन धीम्या गाड्या मुलुंड आणि कल्याणदरम्यान जलद मार्गावरून चालवल्या जातील. त्यामुळे या गाड्या कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. त्याचप्रमाणे, कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्याही काही वेळासाठी जलद मार्गावर वळवण्यात येतील.


याशिवाय, ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन जलद गाड्यांना कळवा, मुंब्रा आणि दिवा या अतिरिक्त स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. तरीही, सर्व गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा साधारण १५ मिनिटे उशिराने धावतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मेल व एक्स्प्रेस गाड्यांवरही या ब्लॉकचा परिणाम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरहून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार, ठाणे आणि कल्याणदरम्यान पाचव्या मार्गावरून वळवण्यात येतील. तसेच, सीएसएमटीकडे येणाऱ्या अप गाड्या सहाव्या मार्गावरून वळवल्या जातील.


काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशनही करण्यात आले आहे. ४ आणि ५ एप्रिल रोजी धावणाऱ्या गोरखपूर-सीएसएमटी, भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस यांसारख्या गाड्या ठाणे येथेच थांबवण्यात येणार आहेत, तर मडगावहून येणाऱ्या तेजस, मांडवी आणि जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या पनवेल येथेच थांबवण्यात येतील. त्याचप्रमाणे, काही गाड्या पनवेल आणि दादर येथूनच सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये कोकण कन्या एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेसचा समावेश आहे. ५ एप्रिल रोजी सुटणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले असून वंदे भारत, महानगर एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस आणि इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्या उशिराने सुटतील. ब्लॉकमुळे ४ एप्रिल रोजी धावणाऱ्या काही गाड्यांचे २० ते ४० मिनिटे नियमन करण्यात येणार आहे. यामध्ये बल्लारशाह-सीएसएमटी, कोकण कन्या एक्स्प्रेस आणि चेन्नई-सीएसएमटी एक्स्प्रेसचा समावेश आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की पायाभूत सुविधांची देखभाल, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी हे ब्लॉक्स अत्यावश्यक आहेत. तरीही, यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली असून प्रवाशांनी पर्यायी प्रवासाची योजना आखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत