छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड; शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई

मुंबई: शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. २ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेवरून व गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर रोडवरील मौजे खोजेवाडी शिवारात धाड टाकण्यात आली.


हॉटेल साईयश परिसरात केलेल्या या कारवाईदरम्यान एलपीजी टँकरचे सील तोडून गॅस चोरी करताना दोन व्यक्ती रंगेहात आढळून आले. तपासात एचपी कंपनीचे दोन कॅप्सूल टँकर (क्रमांक MH43 K 5921 व MH43 CK 5747) आढळले. या टँकरमध्ये अनुक्रमे १७,५९० किलो व १७,६३० किलो एलपीजी गॅस साठवलेला होता.


याशिवाय घटनास्थळावरून १९.२ किलो क्षमतेचे १७ भरलेले व ६ रिकामे सिलेंडर, १४.२ किलोचा १ भरलेला सिलेंडर तसेच ५ किलोचे २ भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले. एकूण ३५,२२० किलो एलपीजी गॅस, २ टँकर आणि २६ सिलेंडर असा सुमारे १ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


दक्षता पथकाच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गॅसचा घरगुती वापरासाठी उपयोग केला असता सुमारे २४८० कुटुंबांची गरज भागू शकली असती.


या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात छत्रपती संभाजी नगर,एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.