फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात PSI गोपाळ बदनेला जामीन

कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी मागील पाच महिन्यांपासून तुरुंगात असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यामुळे पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने तुरुंगाबाहेर येणार आहे.


काय आहे प्रकरण ?


फलटणमधील एका हॉटेलच्या रूममध्ये महिला डॉक्टरने गळफास घेऊन स्वतःचा जीवनप्रवास संपवला. या महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी स्वतःच्या हातावर पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे लिहिली होती. या प्रकरणात तपास करून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. यानंतर पोलिसांनी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना अटक केली. दोघांवर महिला डॉक्टरचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला.


मागील पाच महिन्यांपासून गोपाळ बदने तुरुंगात होता. जामीन मिळवण्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे अर्ज केला होता. या प्रकरणात सुनावणीअंती कोल्हापूर सर्किट बेंचने आरोपी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Comments
Add Comment

Solapur Crime News : टोमणे, मारहाण अन् ५ लाखांची मागणी... २६ वर्षीय सादियाचा दुर्दैवी अंत, पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

सोलापूर : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून २६ वर्षीय विवाहितेने

LPG Cylinder : १ ऑक्टोबरपासून LPG सिलिंडर बुकिंगचे नियम बदलणार; अनुदानित सिलिंडरसाठी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन अनिवार्य

मुंबई : घरगुती LPG सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑक्टोबर २०२६पासून अनुदानित दरात घरगुती

Thane Crime: गुटखा तस्करीचा पर्दाफाश! कळवा पोलिसांकडून दोन वॅगनआरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

ठाणे: कळवा पोलिसांनी गुटख्याचा अवैध पद्धतीने व्यापार करणाऱ्यांवर मोठी कारवाई केलेली आहे. पोलिसांनी सापळा रचून

Bhopal News : ‘टीव्ही पाहायला सांगितलं, लग्नाच्या तयारीवरही बोलणं झालं’ अन् काही तासांतच अनर्थ; कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

भोपाळ : मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यातील प्रसिद्ध बगलामुखी मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या ओडिशातील एका

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! सोलापूर विभागातील ७ स्थानकांवर २०९ कोटींची अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा

मुंबई : भारतीय रेल्वेने सिग्नलिंग व्यवस्था अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. मध्य

Mumbai Traffic: सिद्धिविनायकाच्या जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, मंदिर परिसरात वाहतुकीचे निर्बंध

मुंबई: मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरामध्ये २९ सप्टेंबरला वाहतूक