मुंबई: मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरामध्ये २९ सप्टेंबरला वाहतूक पोलिसांकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. ...
कळव्याचे सहायक पोलीस आयुक्त संकेत देवळेकर यांना १६ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. स्थानिक बाजारपेठांमध्ये वितरणासाठी नाशिक-मुंबई महामार्गावरून मारूती सुझूकी बॅलेनो आणि टाटा टिएगो या दोन वाहनांमधून गुटखा आणि पान मसालाची अवैध रित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांच्या निर्देशानुसार, कळवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने खारेगाव टोल नाक्याजवळ सापळा रचला. सकाळी अंदाजे ६.३० वाजता, अधिकाऱ्यांनी दोन संशयित वाहने अडवली. सखोल तपासणीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला.
मुंबई : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात यंदाच्या आशिया कपनंतर एक अनोखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही भारतीय संघांनी आशिया कपचे ...
"नाशिकहून ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने गुटखा आणि पान मसाल्याची अवैध रित्या होत असल्याची विश्वसनीय माहिती मिळताच, आमच्या पथकांनी तात्काळ खारेगाव टोल नाक्यावर सापळा रचला. कळवा पोलिसांच्या विशेष पथकाने दोन्ही चार चाकी, गुटखा आणि पान मसाला सोबतच दोन्हीही आरोपींना ताब्यात घेतले आहेत. आरोपीच कार चालक होते. ह्या कनेक्शनचे कुठपर्यंत पाळे- मुळे आहेत, ह्याचा शोध आमच्या टीमकडून घेतला जात आहे. ह्या प्रकरणामधील सर्वच दोषींवर आमच्या टीमकडून कारवाई केली जाणार आहे, " अशी माहिती कळवा पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकार्याने माध्यमांना दिली. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या संबंधित तरतुदींनुसार आणि अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम २६(२), २७(२) आणि ५९ अंतर्गत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.