भोपाळ : मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यातील प्रसिद्ध बगलामुखी मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या ओडिशातील एका कुटुंबावर परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर आलेल्या पाण्यातून कार घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना कार पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून नाल्यात पडली. शनिवारी पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांसह कार चालकाचा मृत्यू झाला. (Bhopal News)
पाण्याचा प्रवाह वाढला अन् कार वाहून गेली
मिळालेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर येथे राहणारे हे कुटुंब बगलामुखी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून ते नलखेडा परिसरातून कारने परतत होते. यावेळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे पावसाळी नाल्याचे पाणी वाढले होते आणि रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
कारने पाण्याने भरलेला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पाण्यात वाहून गेली. त्यानंतर कार नाल्यात बुडाली.(Bhopal News)
मुंबई : ब्रिटनमधील पोर्ट टॅलबोट स्टील प्लांटच्या परिवर्तन प्रकल्पाला होत असलेल्या विलंबामुळे टाटा स्टीलने यूके सरकारकडे अतिरिक्त आर्थिक मदतीची ...
बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न
अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि परिस्थिती अत्यंत कठीण असल्याने बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
अनेक प्रयत्नांनंतर कार नाल्यातून बाहेर काढण्यात आली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. कारमधील सात कुटुंबीय आणि चालकाचा मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आले.(Bhopal News)
मृतांमध्ये दोन मुले, साखरपुडा होणाऱ्या तरुणीचाही समावेश
या अपघातात शिवप्रसाद बेहरा, त्यांचा मुलगा राजवीर, मुलगी सायना सोनप्रभा, शिवप्रसाद यांची बहीण रितारानी बेहरा, त्यांचे पती ज्ञानेंद्र बेहरा, त्यांचा मुलगा स्वस्तिक आणि आणखी एक बहीण राणी बेहरा यांचा मृत्यू झाला. या सात जणांसोबत कार चालकाचाही जीव गेला. (Bhopal News)
राणी बेहरा यांचा लवकरच साखरपुडा होणार होता. त्यामुळे या दुर्घटनेने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
मुंबई : भारतीय रेल्वेने सिग्नलिंग व्यवस्था अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सात ...
‘घरात लग्नकार्याची तयारी सुरू होती...’
या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी दुःख व्यक्त केले. शिवप्रसाद यांच्या भावाने कुटुंबासोबत झालेल्या अखेरच्या फोन कॉलची आठवण सांगितली. ते मुलांसह मध्य प्रदेशात देवदर्शनासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी कुटुंबीयांशी फोनवरून संवादही झाला होता. त्यानंतर काही वेळातच अपघाताची दुर्दैवी बातमी समोर आली.
कुटुंबात लवकरच लग्नकार्य होणार असल्याने त्याची तयारी सुरू होती. या आनंदाच्या वातावरणावर या दुर्घटनेमुळे दुःखाची छाया पसरली आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Bhopal News)