निवडणूक आयोगाला पाठवलेल्या ‘त्या' पत्रावरून राष्ट्रवादीत ठिणगी?

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वादाचे वारे वाहू लागले असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या एका पत्रात ज्येष्ठ नेत्यांच्या पदांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा ठपका ठेवत तटकरे यांनी गर्जे यांना झापल्याचे समजते.


अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली. पक्षाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर १० मार्च रोजी त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. या पत्रात सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर 'अध्यक्षा' आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर 'खजिनदार' असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. मात्र, याच पत्रात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नावांचा उल्लेख असताना त्यांच्या पदांचा उल्लेख करण्यात आला नव्हता. हे पत्र कार्यालयीन जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे यांनीच तयार केल्याचे समोर आल्यानंतर तटकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


नेमका वाद काय? : २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीतील कागदपत्रांमध्ये केवळ 'राष्ट्रीय अध्यक्ष' आणि 'कोषाध्यक्ष' या दोनच पदांचा उल्लेख करण्यात आला होता. याच तांत्रिक मुद्द्यावरून तटकरे आणि गर्जे यांच्यात वादाची ठिणगी पडली. पक्षातील सर्वोच्च नेत्यांची पदे डावलल्याने तटकरे नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण