Chhatrapati Sambhajinagar Crime : एन-६ सिडको परिसरात मध्यरात्री गोळीबार; तरुण पुरोहिताने स्वतःच्याच डोक्यात...

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-६ परिसरातील साईनगर येथे काल रात्री उशिरा गोळीबाराची एक थरारक घटना घडली. ३१ वर्षीय समीर नाईक या तरुणाने राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गोळी कानाजवळून डोक्याच्या आरपार गेल्याने समीरची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



नेमकी घटना काय?


समीर नाईक हा आपल्या आई आणि लहान भावासोबत साईनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. तो व्यवसायाने पौरोहित्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी समीरची आई बजरंग चौकातील आपल्या बांगड्यांच्या दुकानात गेली होती. घरात समीर एकटाच असताना हा धक्कादायक प्रकार घडला. रात्री उशिरा जेव्हा समीरचा लहान भाऊ घरी परतला, तेव्हा त्याला समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि शेजारीच एक पिस्तूल पडलेले आढळून आले.



नैराशातून पाऊल उचलल्याचा संशय


घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार, समीरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांना दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि भांगेच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. ३१ वर्षांचा होऊनही अद्याप लग्न न झाल्यामुळे समीर गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी माहिती समोर येत आहे. याच नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.



पोलीस तपास सुरू


या घटनेबाबत माहिती देताना सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले की, "घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक पोहोचले असून तपास सुरू आहे. समीरने वापरलेले पिस्तूल बेकायदेशीर आहे की अधिकृत, तसेच यामागे अन्य काही कारण आहे का, याचा शोध घेतला जात आहे." समीरच्या या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे आणि हळहळीचे वातावरण पसरले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीरची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून डॉक्टर त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी