Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री बावनकुळेंच्या नावावर बाराशे एकर जमीन असल्याचा दावा खोटा

सोशल मीडियावरील दिशाभूल महागात; खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल


मुंबई : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे तब्बल १ हजार १४७ एकर जमीन असल्याचा दावा करणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. बावनकुळे यांच्याबद्दल चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रशासकीय तपासात हा दावा पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


फेसबुकवर रामेश्वर दरेकर नावाच्या व्यक्तीने एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर १ हजार १४७ एकर जमीन असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला होता. दि. ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती, मात्र या माहितीमुळे समाजाची दिशाभूल होऊन बावनकुळे कुटुंबाची प्रतिमा मलीन झाल्याची तक्रार निखिल रामचंद्र इंगळे यांनी पोलिसांत दिली.


या तक्रारीनंतर प्रशासकीय पातळीवर खातरजमा करण्यात आली. कामठी तहसीलदारांनी जारी केलेल्या अधिकृत प्रमाणपत्रानुसार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर विविध गावे व सर्वे क्रमांकांमध्ये मिळून एकूण २८.४४ एकर जमीन आहे. समाजमाध्यमांवर केला जाणारा १ हजार १४७ एकर जमिनीचा दावा हा वस्तुस्थितीला धरून नसून पूर्णपणे धादांत खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी ३ एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद केली. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ७८(१)(ii) आणि ३५६(२) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर