Navnath Ban : महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा जनतेनेच शाहिस्तेखान केला

- भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊत यांच्यावर प्रहार


मुंबई : महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची बोटे छाटण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीतच केले असल्याचा घणाघात करत त्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद देण्याचे काम जनतेने केले आहे. कधीकाळी राज्यातील मोठा पक्ष असलेल्या उबाठाने आपल्या पक्षाचा आत्मा सोडला असून ती कॉंग्रेसच्या वळचणीला गेल्याचा प्रहार भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नवनाथ बन बोलत होते.


राजकारणातील संवेदनशीलतेबाबत बोलायचे तर या संवेदनशीलतेला नख लावण्याचे काम उबाठाने केले आहे. नारायण राणे, कंगना राणावत आणि मोहित कुंबोज यांचे घर पाडणे, व्यंगचित्र काढले म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणे, ही असंवेदनशीलतेचीच उदाहरणे आहेत. महाविकास आघाडीच्या राज्यातच केतकी चितळे तसेच पत्रकारांचा आवाज दडपण्यासाठी त्यांनाही अटक झाली तेव्हा संवेदनशीलतेवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांनी कधीच गमावला आहे, अशी टीका बन यांनी केली.


बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीमध्ये कोणती भूमिका घ्यावी याबाबत उबाठा आणि संजय राऊत यांच्यात संभ्रम आहे. संजय राऊत यांनी आतापासूनच कॉंग्रेसची तळी उचलण्याचे धोरण अवलंबले आहे. आताच ते कॉंग्रेसचा उदो उदो करत आहेत. कारण आणखी काही वर्षांनी आपल्याला कॉंग्रेसमध्येच जायचे आहे हे त्यांनी ठरवलेलेच आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते हर्षवर्धन सकपाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात अशा नेत्यांपेक्षा आपल्यालाच कॉंग्रेस अधिक कळते असे दाखवून संजय राऊत यांना राहुल गांधी यांना प्रभावित करायचे असल्याचे नवनाथ बन यांनी सुनावले.


भाजपाने नाती जपली नाहीत असा आरोप संजय राऊत करत आहेत. मात्र ज्यांनी स्वत:च्या भावाचे नाते जपले नाही त्यांनी भाजपाबद्दल बोलू नये. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. मात्र उबाठाने अमित ठाकरे यांच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला तेव्हा त्यांना नाती आणि परंपरा आठवली नाही का, असा सवाल बन यांनी केला.


महाविकास आघाडी म्हणजे तीन चाकी रिक्षा आहे, जिची तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशांना जातात. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांमध्ये यातील घटक पक्षांचे एकमत होत नाही. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यातही कमालीचे मतभेद आहेत. गटबाजीचे राजकारण होत महाविकास आघाडी गटबाजीत गटांगळ्या खात असल्याची सणसणीत टीका नवनाथ बन यांनी केली.

Comments
Add Comment

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार