Goregaon News : गोरेगावात शोभायात्रेदरम्यान दोन गट भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज, ८ जणांना अटक

मुंबई : काल गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये अचानक उसळलेल्या वादाने हिंसक रूप धारण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, मरियम माता शोभायात्रा सुरू असताना संतोष नगर मार्केट परिसरातील ज्योती बार अँड रेस्टॉरंटजवळ किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. काही क्षणातच हा वाद तीव्र होत मारहाणीपर्यंत पोहोचला. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांकडून ढकलाढकली, मारहाण आणि गोंधळ उडाला.


या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


दरम्यान, दिंडोशी पोलीस ठाणे येथील पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रथम जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने हलका लाठीचार्ज करण्यात आला.


या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत ८ जणांना अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

रावणाचे उदात्तीकरण आणि प्रभू श्रीरामांचा अपमान खपवून घेणार नाही, हिंदु जनजागृती समिती आक्रमक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रामायण' चित्रपटात मूळ कथेचा विपर्यास करून रावणाचे उदात्तीकरण आणि प्रभू श्रीराम,

Central Railway : नेव्ही हाफ मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या 2 विशेष लोकल; कल्याण आणि पनवेलहून मध्यरात्री सुटणार

मुंबई : ‘डब्ल्यूएनसी नेव्ही हाफ मॅरेथॉन-2026’ मध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 2 विशेष

Western Railway Mega Block : रविवारी पश्चिम रेल्वेचा ५ तासांचा जम्बो ब्लॉक; चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान रेल्वे वाहतुकीत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे.

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; फरार अभिषेक पंडितविरोधात 'लूकआऊट' जारी, पत्नीला अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता अधिक

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; फरार अभिषेक पंडितविरोधात लुकआऊट नोटीस

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणातील

Samantha Ruth Prabhu news : समंथा प्रभू आणि राज निदिमोरू यांच्या घरी चिमुकल्या 'देव'चे आगमन; पहिला फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Prabhu) आणि चित्रपट निर्माते राज निदिमोरू (Raj Nidimoru) यांच्या संसारात एका