Western Railway Mega Block : रविवारी पश्चिम रेल्वेचा ५ तासांचा जम्बो ब्लॉक; चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान रेल्वे वाहतुकीत बदल

मुंबई सेंट्रल (Mumbai Central) स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री अरुण कुमार मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक रविवारी सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो लाईनवर असणार आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेट (churchgate) आणि मुंबई सेंट्रल (Mumbai Central) स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री अरुण कुमार मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक रविवारी सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो लाईनवर असणार आहे.






प्रवासातील महत्त्वाचे बदल


फास्ट लाईनवरून धावणाऱ्या गाड्या : ब्लॉकच्या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान स्लो लाईनच्या सर्व उपनगरीय गाड्या फास्ट लाईनवरून चालवण्यात येतील.


रद्द होणाऱ्या गाड्या : या कामामुळे काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द राहणार आहेत.


शॉर्ट टर्मिनेशन : चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या वांद्रे किंवा दादर स्थानकांपर्यंतच चालवल्या जातील.


ब्लॉकमुळे नेमक्या कोणत्या गाड्या रद्द झाल्या आहेत किंवा त्यांच्या वेळेत बदल झाला आहे, याची सविस्तर यादी उपनगरीय विभागातील सर्व स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. रविवारी कामासाठी किंवा प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन वेळापत्रकानुसारच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Central Railway : नेव्ही हाफ मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या 2 विशेष लोकल; कल्याण आणि पनवेलहून मध्यरात्री सुटणार

मुंबई : ‘डब्ल्यूएनसी नेव्ही हाफ मॅरेथॉन-2026’ मध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 2 विशेष

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; फरार अभिषेक पंडितविरोधात 'लूकआऊट' जारी, पत्नीला अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता अधिक

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; फरार अभिषेक पंडितविरोधात लुकआऊट नोटीस

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणातील

Samantha Ruth Prabhu news : समंथा प्रभू आणि राज निदिमोरू यांच्या घरी चिमुकल्या 'देव'चे आगमन; पहिला फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Prabhu) आणि चित्रपट निर्माते राज निदिमोरू (Raj Nidimoru) यांच्या संसारात एका

पुनर्वसनाशिवाय प्रभादेवीतील अतिक्रमणांवर कारवाई नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर तोडकामाला स्थगिती

मुंबई : प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील १०१ अतिक्रमित बांधकामांवर तोडकाम

Kartiki Ekadashi 2026 Dadar: कार्तिकी एकादशीनिमित्त दादरमध्ये भक्तीचा जागर! 21 नोव्हेंबरला भव्य दिंडी सोहळा रंगणार

मुंबई: कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुंबईतील दादर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे.