Iran-US-Israel War : पाकिस्तानकडून आलेल्या युध्दविरामाच्या प्रस्तावाला इराणने दाखवली केराची टोपली

इराणने पाकिस्तानकडून मांडण्यात आलेल्या १५ मुद्द्यांच्या शांतता प्रस्तावाला नकार (Iran-US-Israel War) दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, मध्यस्थांमार्फत पाठवण्यात आलेला अलीकडील शांतता प्रस्ताव इराणने फेटाळून लावला आहे. युद्धविरामासंदर्भातील कोणतीही चर्चा इराणच्या राष्ट्रीय हितांचा विचार करूनच केली जाईल, अशी भूमिका तेहरानने पुन्हा स्पष्ट केली आहे.


वृत्तानुसार, पाकिस्तानने तयार केलेल्या मसुदा प्रस्तावाची प्रत इराण आणि अमेरिका (Iran-US-Israel War) या दोन्ही देशांना पाठवण्यात आली होती. या प्रस्तावात युद्ध समाप्त करण्यासाठी ४५ दिवसांच्या युद्धविरामासह होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा प्रस्ताव होता. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी सांगितले की, तेहरानने मध्यस्थांमार्फत आपली भूमिका आणि अटी यापूर्वीच स्पष्ट केल्या होत्या. कोणत्याही प्रकारच्या दबाव किंवा धमक्यांखाली इराण चर्चा करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.


इस्माईल बगाई म्हणाले, “डेडलाइन देणे आणि युद्धाची धमकी देणे हे चर्चेच्या प्रक्रियेशी सुसंगत नाही. तेहरानच्या काही अटी आहेत ज्या पूर्णपणे राष्ट्रीय हितांवर आधारित आहेत आणि त्यांना कोणत्याही तडजोडीचा संकेत म्हणून पाहू नये.” त्यांनी पुढे सांगितले की, “इराण आपल्या योग्य आणि न्याय्य मागण्या स्पष्टपणे मांडण्यास अजिबात कचरात नाही. याकडे तडजोड म्हणून नव्हे, तर आत्मविश्वासाच्या प्रतीक म्हणून पाहिले पाहिजे.” तेहरानने अमेरिकेसाठी (Iran-US-Israel War) आपले राजनैतिक उत्तर तयार केले असून योग्य वेळी त्याची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.


दरम्यान, अमेरिकेचे (Iran-US-Israel War) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५ एप्रिल २०२६ रोजी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत विधान करत, मंगळवार (७ एप्रिल २०२६) हा दिवस इराणमध्ये “पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे” असेल, असे म्हटले. हे विधान इराणमधील वीज प्रकल्प आणि पुलांवर हल्ल्याची अप्रत्यक्ष धमकी असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी अमेरिका-इराण यांच्यात सध्या चर्चा सुरू असल्याचा दावा करत ६ एप्रिल रोजी करार होण्याची शक्यता चांगली असल्याचेही म्हटले.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे