IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?







गुवाहाटीत आज पुन्हा एकदा आयपीएलचा थरार रंगणार असला, तरी आकाशात दाटलेले काळे ढग चाहत्यांची चिंता वाढवत आहेत. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आजचा सामना पावसाच्या सावटाखाली होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सामना गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियम येथे रंगणार आहे.


रियान पराग यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकत दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एक विजय मिळवला असला तरी मागील सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.


दरम्यान, यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे गुवाहाटीतील हवामान आज निर्णायक भूमिका बजावू शकते.



कसा असेल हवामानाचा अंदाज?


आज गुवाहाटीत सुमारे १० टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने खेळपट्टीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. दमट हवामानामुळे फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, तर वेगवान गोलंदाजांना सीम मूव्हमेंटचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.



हेड-टू-हेड आकडेवारी


मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत ३१ सामने खेळले गेले आहेत. यापैकी मुंबईने १६ सामने जिंकले, तर राजस्थानने १४ वेळा विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.



हार्दिक खेळणार का?


मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मागील सामन्यात आजारपणामुळे खेळू शकला नव्हता. त्या सामन्यात सूर्यकुमार यादव यांनी नेतृत्व केले होते, पण संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र, हार्दिक पांड्या संघासोबत गुवाहाटीत दाखल झाल्याने आज तो खेळण्याची शक्यता जास्त आहे.



सामना कुठे पाहाल?


राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना आज संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक ७ वाजता होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल. तसेच JioHotstar ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.









Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या