चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या मनातील सुख-दु:ख, आनंद कागदावर चितारता येतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार होते. शाब्दीक फटकाऱ्यांसह कुंचल्यातूनही त्यांचे फटकारे उमटत असे. त्यामुळे कोणतेही चित्र साकारत असताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा, असा सल्लाही शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.


मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने १ मार्च २०२६ रोजी बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ५१ ठिकाणी आयोजित या स्पर्धेमध्ये पाच गटांत एकूण ८६ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी २४ मार्च २०२६ रोजी घोषित केला होता. यंदाचे हे स्पर्धेचे १७ वे वर्षे होते.


भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात या स्पर्धेतील विजेत्या ६५ विद्यार्थ्यांना मंगळवारी ७ एप्रिल २०२६ रोजी पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शिरवडकर बोलत होत्या. समाजवादी पक्षाच्या गटनेत्या अमरीन अब्रहानी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किर्तीवर्धन किरतकुडवे, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, कला अकादमीचे प्राचार्य दिनकर पवार, संबंधित कला शिक्षक यावेळी उपस्थित होते.


महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा म्हणजे प्रेरणादायी आणि कलासंस्कार घडविणारा स्तुत्य उपक्रम आहे. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. त्यामुळे अशा स्पर्धा आयोजित करून मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देते, असे मत शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी व्यक्त केले.


शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किर्तीवर्धन किरतकुडवे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेविषयी माहिती दिली. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन पेंग्विन सभागृहाबाहेर भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनालाही शिरवडकर आणि मान्यवरांनी भेट दिली. आरती खेर यांनी आभार मानले. कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखविणारी महानगरपालिकेच्या विक्रोळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेतील इयत्ता नववीची विद्यार्थीनी मृणाल काळे हिच्या सूत्रसंचालन कौशल्याचे कौतुक करीत मान्यवरांनी तिचाही यावेळी सत्कार केला.


प्रत्येक गटातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रत्येकी २० हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस १५ हजार रुपये तसेच पदक आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. प्रत्येक गटातील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये आणि पदक तसेच प्रशस्तिपत्र देण्यात आले. तसेच विभाग स्तरावर प्रत्येक गटात ५ याप्रमाणे २५ अशी एकूण २५ प्रशासकीय विभागांमध्ये ६२५ उत्तम चित्रांना प्रत्येकी ५०० रुपयांचे रोख पारितोषिके आणि पदक देण्यात आले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने