MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा


मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून राबविण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प नियोजनानुसार सुरू असून मे २०२७ पर्यंत मुंबईतील मुंबईतील सीसी रस्त्यांचे काम मे २०२७ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिली.


महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतर आमदार अमीत साटम यांनी मुंबईत सुरू असलेल्या रस्ते कामांविषयी माहिती दिली.


मुंबईतील एकूण रस्त्यांचे जाळे सुमारे २,०५० किमी आहे. त्यापैकी २०२२ पूर्वीच सुमारे १,२०० किमी रस्ते सिमेंट काँक्रिट (CC) मध्ये रूपांतरित करण्यात आले होते. २०२२ नंतर आणखी ६७७ किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले असून त्यापैकी सुमारे ७१% म्हणजेच ४८१ किमी काम पूर्ण झाले आहे, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.


आमदार अमीत साटम यांनी पुढे सांगितले की हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबविला जात आहे. पहिला टप्पा ३०७ किमीचा असून तो ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू झाला, तर दुसरा टप्पा ३७० किमीचा असून तो ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाला.


उर्वरित कामांपैकी १०–१५% काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तर आणखी १०% काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण प्रकल्प मे २०२७ पर्यंत पूर्ण होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर सुमारे १,९०० किमी रस्ते पूर्णपणे काँक्रिटीकरण करण्यात आलेले असतील, असे त्यांनी नमूद केले.


कामांची गुणवत्ता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आयआयटी ची थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या IIT दुसऱ्या टप्प्याचे ऑडिट करत असून आता पहिल्या टप्प्याचेही ऑडिट करणार असल्याचे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.


आर्थिक परिणामांबाबत बोलताना त्यांनी खड्डे दुरुस्तीवरील खर्चात सातत्याने घट होत असल्याचे सांगितले. २०२३–२४ मध्ये हा खर्च २०२ कोटी रुपये होता. तो २०२४–२५ मध्ये १५६ कोटी रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजे त्यात २३% घट झाली. २०२५–२६ मध्ये हा खर्च आणखी कमी होऊन ८९ कोटी रुपये झाला, म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत ४३% घट झाली. चालू वर्षासाठी खड्डे दुरुस्तीचा निविदा खर्च सुमारे ४४ कोटी रुपये अपेक्षित आहे, म्हणजेच आणखी ५०% घट होईल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.


Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन