Panama fuel tanker blast : पनामामध्ये इंधन टँकरचा भीषण स्फोट, अनेक जण जखमी

वॉशिग्टन : पनामामध्ये एका पुलाजवळ सोमवारी इंधन वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. स्फोटानंतर टँकरला लागलेली आग काही वेळातच भयानक स्वरूप धारण करत पुलाच्या मुख्य भागालाही वेढून गेली. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती असून एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.


ही घटना पनामा कालव्याच्या पॅसिफिक प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ब्रिज ऑफ द अमेरिकाज परिसरात घडली. स्फोट इतका तीव्र होता की आगीच्या ज्वाळा पुलाच्या रस्त्यापर्यंत पोहोचल्या, त्यामुळे परिसरातील लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली.


स्थानिक वृत्तांनुसार, आगीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव पुल काही काळासाठी बंद करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने पुल तात्पुरता बंद केल्याची पुष्टी केली आहे. अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “वाहनचालकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी हा खबरदारीचा उपाय करण्यात आला असून, पुलाची संरचनात्मक स्थिती तपासण्यासाठी विशेष तांत्रिक पथके तपासणी करत आहेत.”


ब्रिज ऑफ द अमेरिकाज हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता मार्ग असून त्याची लांबी सुमारे 1,654 मीटर आहे. हा पूल पनामा कालव्याच्या पॅसिफिक प्रवेशद्वारावर स्थित असून जगातील सर्वात धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या सागरी वाहतूक मार्गांपैकी एका महत्त्वाच्या ठिकाणाच्या अगदी जवळ आहे.मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुज सामुद्रधुनीवर निर्बंध लावल्यानंतर अमेरिकेतून जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या काही खेपा पनामा कालवामार्गे आशियाकडे वळवण्यात आल्या होत्या.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.