Mockdrill In Navi Mumbai : नवी मुंबईत नागरी संरक्षण दलाचा भव्य 'मॉकड्रिल' सराव

नवी मुंबई : आपत्ती काळात नागरिकांचे संरक्षण आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या 'नागरी संरक्षण दल' (Civil Defence) वतीने नवी मुंबईत एका विशेष 'मॉकड्रिल'चे (प्रात्यक्षिक सराव) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी नागरी संरक्षण दलाला नवी मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य लाभणार आहे.


​ ​हे प्रात्यक्षिक गुरुवार, ९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. कोपरखैरणे येथील सेक्टर-११, बोनकोडे गाव येथील 'माजी सरपंच स्व. गणपतशेठ फकीरजी नाईक मैदान' येथे हा प्रात्यक्षिक सराव संपन्न होणार असून दुपारी २:०० ते ५:०० (दोन ते पाच) या वेळेत हे मॉकड्रिल पार पडणार आहे.


​ ​या सरावामध्ये केवळ नागरी संरक्षण दलच नाही, तर विविध शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग असणार आहे. यामध्ये ​विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, ​होमगार्ड्स आणि स्वयंसेवक, ​T.D.R.F. (ठाणे आपत्ती प्रतिसाद दल) आणि N.D.R.F. (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल), ​पोलीस प्रशासन, प्रसारमाध्यमे ​याशिवाय परिसरातील मान्यवर देखील या मोहिमेचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.


​ ​या मॉकड्रिलसाठी साधारणपणे २०० ते ३०० स्वयंसेवक आणि जवानांची उपस्थिती अपेक्षित आहे. केंद्र आणि राज्य सरकारद्वारे आयोजित हा एक राष्ट्रीय उपक्रम आहे. आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणा कशा प्रकारे धावून येतात, नागरिकांना सुरक्षित स्थळी कसे हलवले जाते आणि तातडीने मदत कार्य कसे राबवले जाते, याचा थेट सराव या निमित्ताने केला जाणार आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाची सज्जता तपासण्यास मदत होणार आहे. ​


बोनकोडे आणि कोपरखैरणे परिसरातील नागरिकांनी या सरावामुळे गोंधळून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच या राष्ट्रीय उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन उपनियंत्रक, नागरी संरक्षण (नवी मुंबई समूह) विजय ब. जाधव यांनी केले आहे.

Comments
Add Comment

India Hypersonic Missile Test: ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट अधिक वेग! भारताच्या हायपरसोनिक तंत्रज्ञानाची जगभर चर्चा

भारताच्या संरक्षण क्षेत्रात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून भारत

CAT 2026 : CAT 2026 चे प्रवेशपत्र जारी; 29 नोव्हेंबरला तीन सत्रांत होणार परीक्षा

 CAT 2026: व्यवस्थापन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन

पुतिन यांच्या दूताची थेट व्हाईट हाऊसमध्ये एन्ट्री! ट्रम्प यांच्या एका ‘मोठ्या’ निर्णयामुळे रशिया-युक्रेन युद्ध संपणार?

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले महाभयंकर युद्ध आता अखेर अंतिम

भारत सरकारचा मोठा निर्णय ! 3 स्वदेशी AI मॉडेल लॉन्च, खास वैशिष्ट्ये जाणून घ्या

टेक्नोलॉजीच्या जगात भारताने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. भारत सरकारने तीन नवीन स्वदेशी AI मॉडेल लॉन्च केले आहेत. EKA-1,

Nana Patekar Memories:  नाना पाटकरांच्या आठवणीत क्रांती रेडकर भावुक, म्हणाली इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'...

Nana Patekar Memories: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. क्रांतीने 'मैत्रेया' (Maitreyaa)

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपणार का? वेलिंग्टनमधील रेकॉर्ड पाहून तुम्हीही तसंच म्हणाल

[caption id="attachment_1072774" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ पाच सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या